नाशिक : आदिवासी मतदारांचा वाखाणण्याजोगा उत्साह, नृत्य सादर करत मतदारांचं स्वागत
By संकेत शुक्ला | Published: May 20, 2024 11:14 AM2024-05-20T11:14:48+5:302024-05-20T11:18:31+5:30
नाशिक : सातत्याने दुष्काळी असलेल्या पेठ भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड मारामार असते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कारभाऱ्यांबद्दल चीड ...
नाशिक : सातत्याने दुष्काळी असलेल्या पेठ भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड मारामार असते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये कारभाऱ्यांबद्दल चीड असली तरी मतदानाच्या टक्केवारीत ती दिसून येत नाही. दिंडोरी मतदार संघातील एक भाग असलेल्या पेठ तालुक्यापासून चार किलोमीटर लांब बसलेल्या वांगळी परिसरामध्ये 1047 इतके मतदार आहेत.
हा मतदारसंघ आदर्श मतदारसंघ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या मतदारांमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्साह दिसून येतो मागील निवडणुकीत येथे 61 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीतही सकाळपासून मतदार मतदानासाठी येत असून पारंपारिक पद्धतीने नृत्य सादर करत येथे ग्रामस्थच मतदारांचे स्वागत करीत आहेत.