नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी दिले राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 02:15 AM2019-10-16T02:15:04+5:302019-10-16T02:15:44+5:30

जागावाटपात नाशिक पश्चिमची जागा न सुटल्याने शिवसेनेच्या साडेतीनशे पदाधिकारी आणि ३४ नगरसेवकांनी मंगळवारी (दि. १५) राजीनामे दिले असून, त्यामुळे शिवसेनेबरोबरच भाजपलादेखील धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर त्यांनीदेखील ही गंभीर बाब असल्याचे नमूद केले आहे.

 Nashik: All corporators including Shiv Sena office bearers resigned | नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी दिले राजीनामे

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला कुलूपच ठोकण्यात आले.

Next
ठळक मुद्देजागावाटपाचा तिढा : पत्रकार परिषदेत घोषणा; भाजपलाही धक्का

नाशिक : जागावाटपात नाशिक पश्चिमची जागा न सुटल्याने शिवसेनेच्या साडेतीनशे पदाधिकारी आणि ३४ नगरसेवकांनी मंगळवारी (दि. १५) राजीनामे दिले असून, त्यामुळे शिवसेनेबरोबरच भाजपलादेखील धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर त्यांनीदेखील ही गंभीर बाब असल्याचे नमूद केले आहे.
शहरातील अंबड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी यासंदर्भात घोषणा
केली. त्यानुसार त्यांच्यासह ३४ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेच, शिवाय दोन महानगर प्रमुख आणि अन्य साडेतीनशे पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहे.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली त्यात भाजपाच्या सीमा हिरे विजयी झाल्यानंतर यंदाही जागा भाजपाकडेच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व इच्छुकांनी एकत्र येऊन एकच बंडखोर उभा केला आहे. त्याविरुद्ध भाजपाने आधी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील तक्रार केली होती.

Web Title:  Nashik: All corporators including Shiv Sena office bearers resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.