जळगावच्या महापौरपदासाठी नाशिकही घडामोडीचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:57+5:302021-03-16T04:15:57+5:30
नाशिक- येत्या १८ मार्च रोजी होेणाऱ्या जळगावच्या महापौरपदासाठी नाशिक हे देखील घडामोडीचे केंद्र बनले असून भाजपाचे फुटीर नगरसेवक हे ...
नाशिक- येत्या १८ मार्च रोजी होेणाऱ्या जळगावच्या महापौरपदासाठी नाशिक हे देखील घडामोडीचे केंद्र बनले असून भाजपाचे फुटीर नगरसेवक हे शिवसेनेबरोबर नाशिकमध्ये थांबूनच ठाण्याकडे रवाना झाले आहेत. तर जे भाजपा नगरसेवक फुटलेले नाहीत त्यातील सध्या नाशिकमध्येच मुक्कामी असल्याचे वृत्त आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याने या निवडणुकीसाठी नाशिकमधीलच काही पक्षातील पदाधिकाऱ्यांना खास जबाबदारी देण्यात आली आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या १८ तारखेला होणार आहे. त्यात भाजपात मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाली असून भाजपचे ५७ पैकी २७ नगरसेवक फुटून सेनेकडे गेले आहेत. सेनेकडे गेलेल्या भाजप नगरसेवकांपैकी चार पुन्हा भाजपकडे गेले होते मात्र, ते आता सेनेकडेच परतले आहेत. त्यामुळे भाजपाला हा धक्का मानला जात आहे. फुटीर नगरसेवक, शिवसेना नगरसेवक आणि यांना घेऊन निघालेल्या रविवारी (दि.१४) बस नाशिक मार्गेच ठाण्यात गेल्या असून आता सेना नेत्यांनी त्यांचा ताबा घेतला आहे. तर भाजपाकडे असलेल्या तीस नगरसेवकांपैकी बावीस देखील भाजपाने सुरक्षित गड म्हणून नाशिकमध्ये हलवले आहे. इंदिरा नगर येथील एका हॉटेलमध्ये अठरा तर चार नगरसेवक शासकीय विश्रामगृहावर होते. सोमवारी त्यांना नाशिकमधून इगतपुरी येथील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी आहेत. मंगळवारी (दि.१६) त्यांना येथूनही आणखी सुरक्षित ठिकाणी नेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावललेल्या भाजपाच्या काही नगरसेवक आणि नेत्यांवर जळगावच्या भाजपा नगरसेवकांच्या सांभाळण्याची आणि सेनेकडे असलेल्या नगरसेवकांना परत आणण्याची जबाबदारी सोपवल्याचे वृत्त आहे. तर कायदेशीरदृष्ट्या देखील अभ्यासाची जबाबदारी एकाकडे देण्यात आली आहे.
इन्फो.,.
भाजपाचे नगरसेवक फुटल्यानंतर जळगावला मोठी खळबळ उडाली. त्यानंतर नाशिकला भाजपाच्या नगरसेवकांना आणण्यात आल्यानंतर त्याबाबत मोजक्याच नगरसेवक आणि पक्ष नेत्यांना माहिती असून अन्य ज्येष्ठ नेते मात्र अनभिज्ञ आहेत.