Nashik: श्री काळारामाला आफ्रिकेच्या जंगलातील वल्कले अर्पण
By Sandeep.bhalerao | Published: July 30, 2023 04:47 PM2023-07-30T16:47:36+5:302023-07-30T16:48:15+5:30
Nashik: बडोदा येथील सिद्धपुरुष दत्तात्रेय सप्रे महाराज यांनी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्रांना आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासींनी झाडाच्या सालीपासून तयार केलेले वल्कले अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २९) प्रभू रामचंद्रांना बडोदा येथून आणण्यात आलेली वल्कले विधिवत पूजन मंत्रोच्चार करत अर्पण करण्यात आली.
- संदीप भालेराव
पंचवटी : बडोदा येथील सिद्धपुरुष दत्तात्रेय सप्रे महाराज यांनी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्रांना आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासींनी झाडाच्या सालीपासून तयार केलेले वल्कले अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २९) प्रभू रामचंद्रांना बडोदा येथून आणण्यात आलेली वल्कले विधिवत पूजन मंत्रोच्चार करत अर्पण करण्यात आली.
सप्रे महाराज यांचे स्नेही आफ्रिकेमध्ये राहत असून, महाराजांनी त्यांच्या स्नेहींना आफ्रिकेच्या जंगलात राहणारे आदिवासी बांधव झाडाच्या सालीपासून वस्त्र अर्थात वल्कले बनवित असल्याचे कळविले होते. त्यांच्या स्नेहींनी त्याचा शोध घेऊन झाडाच्या सालीपासून तयार केलेली ती वल्कले महाराजांना आणून दिली होती तर महाराजांनी ती वल्कले नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रभूरामाला अर्पण करण्याची इच्छा दर्शविली होती. त्यांनी प्रज्ञा जावडेकर यांच्याकडे वल्कले सुपुर्द केली करत नर्मदेच्या जलाने प्रभू रामचंद्रांना अभिषेक करावा, असे सांगितले होते. त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी बडोदा येथून सचिन जोशी झाडाच्या सालीपासून तयार केलेले वल्कले व नर्मदेचे जल घेऊन श्री काळाराम मंदिरात दाखल झाले होते. यावेळी मंत्रोच्चार व विधिवत पूजन करून रामाच्या चरणी वल्कले अर्पण करण्यात आली.
यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, शांताराम अवसरे, अजय निकम, संजय परांजपे, सुनीता परांजपे, विजय चंद्रात्रे, विनायक रानडे आदी उपस्थित होते. आफ्रिकेच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी झाडाच्या साली पासून तयार केलेले कापड रामाला अर्पण केले असून, लवकरच त्यापासून रामाला वस्त्र तयार करून ते परिधान केले जाणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.