नाशिकमध्ये अस्मिता योजनेच्या लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:20 PM2018-03-10T18:20:01+5:302018-03-10T18:20:01+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली असून या योजेच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला नाशिक जिल्ह्यातही सुरुवात झाली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली असून या योजेच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला नाशिक जिल्ह्यातही सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वर्ष वयोगटातील मुलींची नोंदणी नजीकच्या ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व उच्च प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत. ही नोंदणी प्रक्रीय 8 मार्चपूर्वीच पूर्ण करून महिला दिनाचे औचित्यसाधत विद्यार्थीनींना अस्मिता अंतर्गत सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचे ग्रामविकास विभागाचे लक्ष होते. परंतु, नाशिक जिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थिनींची नोंदणी प्रक्रियाच महिला दिन उलटल्यानंतर मुहुर्त मिळाला अाहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्यध्यापकांना लेखी अादेश काढले असून अखेर नाशिक जिल्ह्यातही लाभार्थी नोंदणी प्रक्रियेला सरुवात झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेत 11 ते 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनींच्या नावासह इयत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, छायाचित्र आदी माहिती मुख्याध्यापकांनी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर देऊन केंद्रचालकाकडून नोंदणीची प्रक्रि या पूर्ण करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोरवयीन मुली पात्र आहेत. ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत ग्रामविकास विभागातर्फे 1 मार्च रोजी अस्मिता योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुलींना अस्मिता कार्ड व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीसाठी अस्मिता योजनेअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेपासून खासगी शाळांमधील किशोरवयीन मुली वंचित राहणार आहेत. त्यामुळे खासगी माध्यमाच्या शाळेतील मुलींनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या ही मोठय़ा प्रमाणात आहे.
पाच रुपयांत मिळणार आठ पॅड
अस्मिता योजनेंतर्गत अस्मिता कार्ड व 8 पॅडचे एक पाकीट मुलींना 5 रु पये या माफक दरात दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींना लाभ देण्याबाबत मुलींची नोंदणीप्रक्रि या महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात सुरू होणो अपेक्षित असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महिला दिन उलटून गेल्यानंतर 11 ते 19 वयोगटातील मुलींची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.