Nashik: बच्चु कडू म्हणतात, पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतर पाच वर्षात झाले
By संजय पाठक | Published: September 5, 2023 06:22 PM2023-09-05T18:22:48+5:302023-09-05T18:23:34+5:30
Nashik: काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत
- संजय पाठक
नाशिक - काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत, त्यावर पीएचडीच हेाऊ शकेल असे मत प्रहार संघटनेचे
नेते बच्चु कडू यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले.
खास दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नाशिकमध्ये शासन दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात होता. त्यासाठी नाशिकला
आलेल्या बच्चू कडू यांनी या पक्षांतराबाबत भाष्य केले. विजय वडेट्टीवार तरी भविष्यात कुठे असतील हे सांगता येत नाही अशी कोपरखळी त्यांंनी मारली.
दरम्यान, देशातील विरोधी पक्षांनी इंडीया असे आघाडीचे नाव ठेवल्याने आता इंडीया हे नाव केंद्र सरकार बदलणार असल्याची चर्चा असून त्यावर बेालताना बच्चु कडू यांनी भारत, इंडीया, हिंदुस्थान असे तीन नावे असणारा भारत हा एकमेव देश असल्याने इंडीया नाव बदलण्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.
जालना येथे झालेल्या मराठा आंदाेलकांवर झालेल्या पेालीसांच्या लाठीमार प्रकरणी त्यांनी सरकारचा बचाव केला. राज्यकर्ते अशा प्रकारे लाठी मार करा
असे आदेश कधीच देत नसतात. यापूर्वीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा पवार साहेब असते तरी त्यांनी असे कधीही आदेश दिले नसतील. स्थानिक स्तरावरील अधिकारी परिस्थीती हाताळताना अपयशी ठरल्याने चुका होतात, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात केलेली टीका अनाठायी आहे. मात्र, विरोधक असल्याने त्यांनी टिका केली आहे.