नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत ५६ उमेदवार रिंगणात

By admin | Published: July 1, 2017 12:19 AM2017-07-01T00:19:22+5:302017-07-01T00:19:22+5:30

११ जुलैला मतदान ; ७३ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार

In the Nashik Bar Association elections, 56 candidates are in the fray | नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत ५६ उमेदवार रिंगणात

नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत ५६ उमेदवार रिंगणात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक बार असोसिएशनच्या ११ जागांसाठी ११ जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीत गुरुवारी (दि़२९) अर्ज माघारीच्या दिवशी ७३ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ असोसिएशनच्या ११ जागांसाठी दर चार वर्षांनी निवडणूक घेतली जाते़ जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील ३ हजार ५४ वकील असोसिएशनचे मतदार आहेत.
नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात असून, त्यामध्ये बारचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ श्रीधर माने, अ‍ॅड़ अशोक आव्हाड, अ‍ॅड़ झुंझार आव्हाड, अ‍ॅड़ विजय मोरे, अ‍ॅड़ महेश अहेर यांच्यात लढत होणार आहे़ उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड़ सुरेश निफाडे, अ‍ॅड़ प्रकाश अहुजा, अ‍ॅड़ पुंडलीक गिते, अ‍ॅड़ सुदाम पिंगळे, अ‍ॅड़ अनिल शालिग्राम, तर सचिव पदासाठी अ‍ॅड़ धर्मेंद्र चव्हाण, अ‍ॅड़ भाऊसाहेब ढिकले, अ‍ॅड़ वैभव शेटे, अ‍ॅड़ जालिंदर ताडगे, अ‍ॅड़ राजेंद्र ठाकरे यांच्यात लढत होणार आहे़
असोसिएशनच्या सहसचिव पदासाठी अ‍ॅड़ शरद गायधनी, अ‍ॅड़ हेमंत गायकवाड, अ‍ॅड़ प्रवीण साळवे, सहसचिव (महिला राखीव) या पदासाठी अ‍ॅड़ श्यामला दीक्षित, अ‍ॅड़ विजया माहेश्वरी, अ‍ॅड़ अपर्णा पाटील, अ‍ॅड़ मंगला शेजवळ, खजिनदार पदासाठी अ‍ॅड़ रवींद्र चंद्रमोरे, अ‍ॅड़ संजय गिते, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ दर्शन कुलकर्णी, अ‍ॅड़ बाबासाहेब नन्नावरे, सदस्य (तीन पदे) या पदासाठी अ‍ॅड़ केशव अहेर, अ‍ॅड़ भूमिनी भावसार, अ‍ॅड़ राजेंद्र भुतडा,अ‍ॅड़ अरुण दोंदे, अ‍ॅड़ जयवंत गायधनी, अ‍ॅड़ अनिल गायकवाड, अ‍ॅड़ रत्नदीप गायकवाड, अ‍ॅड़ हर्षद केंगे, अ‍ॅड़ मदन खैरनार, अ‍ॅड़ मिलिंद कुरकुटे, अ‍ॅड़ महेश लोहिते, अ‍ॅड़ अतुल लोंढे, अ‍ॅड़ प्रभाकर मटाले, अ‍ॅड़ शरद मोगल, अ‍ॅड़ तुषार निरगुडे, अ‍ॅड़ प्रेमनाथ पवार, अ‍ॅड़ सईद सय्यद, अ‍ॅड़ नीचल सूर्यवंशी, अ‍ॅड़ स्वप्निल ठुबे, अ‍ॅड़ महेश यादव (पाटील) असे वीस उमेदवार रिंगणात आहेत़
सदस्य (महिला राखीव) या पदासाठी अ‍ॅड़ सोनल कदम, अ‍ॅड़ शबनम मेमन, अ‍ॅड़ मनीषा मंडलीक, अ‍ॅड़ स्वप्ना राऊत या चार महिला वकील, तर सदस्य पदाच्या (७ वर्षांच्या आतील प्रॅक्टिस) एका जागेसाठी अ‍ॅड़ अच्युत निकम, अ‍ॅड़ मोहन निसाळ, अ‍ॅड़ कमलेश पाळेकर, अ‍ॅड़ दिलीप पिंगळे, अ‍ॅड़ सोमनाथ पिंगळे, अ‍ॅड़ किशोर सांगळे, अ‍ॅड़ वसीम सय्यद निवडणूक रिंगणात आहेत़ उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरू केला असून, प्रत्यक्ष भेटीगाठी, छापील पत्रके तसेच सोशल मीडियाचा (व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर) प्रभावी वापर सुरू केला आहे़ या निवडणुकीसाठी अ‍ॅड़ एस़ जी़ सोनवणे, अ‍ॅड़ व्ही़ एम़ जुन्नरे, अ‍ॅड़ एम़ एऩ बस्ते हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत़

--इन्फो--
११ जुलैला मतदान
११ जुलै २०१७ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत जिल्हा न्यायालय, नवीन कोर्ट इमारत, पहिला मजला येथील आयटी लायब्ररीमध्ये मतदान होणार आहे़ १२ जुलै रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहसचिव (महिला) या पदासाठीची मतमोजणी सकाळी ९ वाजेपासून सुरू होऊन मोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे, तर १३ जुलै रोजी उर्वरित पदांची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे़

Web Title: In the Nashik Bar Association elections, 56 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.