नाशिकमध्ये भाजपा आमदार सीमा हिरे आणि नगरसेवकात भर रस्त्यात खडांजगी
By संजय पाठक | Published: April 11, 2019 01:46 PM2019-04-11T13:46:29+5:302019-04-11T13:49:11+5:30
नाशिक- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कालच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमक्ष उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यातील हाणामारीने भाजपातील वाद चव्हाट्यावर आले असताना नाशिकमध्ये आता वाद उफाळून आले आहेत. आपल्या प्रभागात परस्पर प्रचार केल्याचे निमित्त ठरले आणि नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे तसेच याच पक्षाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात सिडकोत भर रस्त्यावर जोरदार खडाजंगी झाली.
नाशिक- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कालच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमक्ष उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यातील हाणामारीने भाजपातील वाद चव्हाट्यावर आले असताना नाशिकमध्ये आता वाद उफाळून आले आहेत. आपल्या प्रभागात परस्पर प्रचार केल्याचे निमित्त ठरले आणि नाशिक पश्चिमच्या भाजपाआमदार सीमा हिरे तसेच याच पक्षाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात सिडकोत भर रस्त्यावर जोरदार खडाजंगी झाली.
गुरूवारी सकाळी उत्तम नगर जवळील बुध्द विहाराजवळ हा प्रकार घडला. लोकसभा निवडणूकीसाठी प्रचार सुरू आहे. आमदार हिरे या कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करीत नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचल्या. यावेळी मुकेश शहाणे तेथे आले आणि त्यांनी भाजपाचेच कार्यकर्ते प्रकाश चकोर यांना परस्पर प्रचार करीत असल्याबद्दल जाब विचारला. आपल्या प्रभागात प्रचार करताना आपल्याला कळवायला हवे होते परंतु परस्पर प्रचार सुरू केल्याने नागरीक फोन करून तुम्ही प्रचारात नाही का असा प्रश्न करीत आहेत असे शहाणे यांचे म्हणणे होते तर आमदार सीमा हिरे यांनी त्यांना तुमचा काय संबंध असा प्रश्न केला. त्यावरून वाद वाढत गेला. शहाणे यांनी मी तुमच्याशी बोलत नाही असे सांगितले परंतु तरीही हिरे आणि शहाणे यांच्यात वाद वाढत गेला. तुम्ही मनसेतून आले आहात असे सांगुन हिरे यांनी त्यांना भाजपात ते आयाराम असल्याची जाणिव करून दिल्याने वादात आणखीनच भर पडली. भर रस्त्यातील या वादामुळे नागरीकांची गर्दी झाली आणि भाजपाची चांगलीच शोभा झाली.
अन्य कार्यकर्त्यांनी वाद मिटवला. दरम्यान, यानंतर सीमा हिरे या मोटारीत बसून तेथून निघून गेल्या. तर शहाणे यांनी पक्ष श्रेष्ठींपर्यत हा वाद नेणार असल्याचे सांगितले.