नाशिकच्या बोटी पर्यटन मंत्र्यांनी सारंगखेड्याला पळविल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:12 PM2017-12-20T18:12:25+5:302017-12-20T18:14:24+5:30
नाशिक येथे प्रादेशिक पर्यटनमधील निधीतून जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च २०१४ मध्ये पुर्ण होऊनही हा बोटक्लब सुरू करण्यात आलेला नाही.
नाशिक : पर्यटन वाढीसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गंगापुर धरणावर उभारलेल्या बोट क्लबसाठी खरेदी केलेल्या बोटी नंदुरबार जिल्ह्याच्या सारंगखेड्याच्या पर्यटनस्थळी पळविण्यात आल्याचा आरोप करून बुधवारी राष्टÑवादीचे आमदार जयंत जाधव व नरहरी झिरवाळ यांनी नागपुर विधीमंडळाच्या पाय-यांवर बसून सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
नाशिक येथे प्रादेशिक पर्यटनमधील निधीतून जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च २०१४ मध्ये पुर्ण होऊनही हा बोटक्लब सुरू करण्यात आलेला नाही. सदर बोट क्लब गंगापुर धरणाच्या बॅक वॉटर भागात असून, या ठिकाणी जेट्टी, प्र्रशासकीय इमारत,इक्विपमेंट करिता देखभाल दुरूस्ती शेड, प्रेक्षक गृह, खुले सभागृह, वाहनतळ इत्यादी तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना बोटिंगसाठी युएसए मेड युरो ४ नॉर्मच्या४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झालेल्या आहेत. तसेच पक्षांबाबत जनजागृतीसाठी पक्षीमित्रांकरीता स्वतंत्र कार्यालय आणि पक्षांच्या चित्रांचे दालन देखील येथे उभारण्यात आले आहे. साहसी क्रिडा संकुलआणि कन्व्हेन्शन सेंटर ही कामे रखडलेली आहेत. निधी मंजुर असुनही सदरचे काम सुरू झालेले नाही. गेल्या तीन वर्षापासून बोट क्लब लवकरात लवकर सुरू करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात विद्यमान पर्यटन मंत्र्यांनी येथील बोटी सारंगखेडा या पर्यटनस्थळी नेल्या आहेत. सदरच्या बोटी लवकरात लवकर पुन्हा नाशिक येथे आणण्यात याव्यात व बोट क्लब सुरू करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार जयंत जाधव व नरहरी झिरवाळ यांन केली व त्यासाठी नागपुरच्या विधीमंडळ अधिवेशन दरम्यान सभागृहाच्या पायºयांवर बसून सरकारचा विरोधात निदर्शने केली.