Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी

By अझहर शेख | Published: October 8, 2022 12:33 PM2022-10-08T12:33:38+5:302022-10-08T12:37:42+5:30

आम्ही थोडक्यात बचावलो, काळ आला होता पण दैव बलवत्तर असल्याने वाचलो आम्हा तिघांचा नवा जन्म झाला असं या दुर्घटनेत बचावलेल्या पूजाने म्हटलं.

Nashik Bus Accident: Thrilling incident! mother jumped from the window of the burning bus with her sons | Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी

Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी

googlenewsNext

नाशिक - औरंगाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात १२ लोकांचा आगीत जळून मृत्यू झाला. ट्रक आणि बसच्या धडकेत इंधनाच्या टाकीने स्फोट घेतला. त्यामुळे बसला आग लागली. या आगीमुळे बसमधून प्रवास करणारे १२ प्रवाशी मृत्युमुखी पडले. तर ३८ जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

हृदय पिळवटून टाकणारा 'तो' प्रसंग

या दुर्घटनेत मूळ वाशीम जिल्ह्यातील रहिवासी विवाहिता पूजा मनोज गायकवाड (27) या त्यांचा आठ वर्षांचा मुलगा व दोन वर्षांचा मयंक आणि १९ वर्षीय मामेभाऊ गणेश लांडगे यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी या बसमधून प्रवास करत होत्या. या दुर्घटनेतून बचावलेल्या पूजा म्हणाल्या की, मी माझ्या दोन मुलांना सोबत घेऊन भाऊ गणेश सोबत प्रवास करत होते. चालक बाजूने तीन क्रमांकाच्या सीट वर आम्ही बसलेलो होतो. मुलांसह मला ही पहाटेची साखरझोप लागली होती तेव्हा बसला अचानक समोरून मोठा ट्रक येऊन धडकला आणि आम्हा सर्वांना मोठा हादरा बसला. आम्ही खडबडून जागे झालो. या धडकेमुळे क्षणार्धात बसला आग लागली व टायर फुटल्याचा आवाज झाला. सगळा आक्रोश रडारड बसमध्ये प्रवाशांची सुरू होती. 

काही वेळेतच पाठीमागूनही आग लागली आणि ती बसमध्ये आल्याने मागील प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लक्षात आले. भाऊ दरवाजाकडे धावला मात्र दरवाजा काही उघडला नाही. अखेर बसची खिडकीची काच फोडली. अगोदर भाऊ खाली उतरला व मी दोघा लेकरांना त्याच्याकडे खिडकीतून सोपविले. त्यानंतर मीसुद्धा खिडकीतून बाहेर पडले. यावेळी काही स्थानिक लोक बसबाहेर मदतीला धावले. आम्ही आमच्या डोळ्यांसमोर बसला आगीत कोळसा होताना बघितले. आम्ही थोडक्यात बचावलो, काळ आला होता पण दैव बलवत्तर असल्याने वाचलो आम्हा तिघांचा नवा जन्म झाला. आमच्यासमोर काही तास सोबत राहिलेले सहप्रवासी जळून मेले. हा आयुष्यात घडलेला सर्वात वाईट प्रसंग असून तो कायमचा मनावर कोरला गेला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Nashik Bus Accident: Thrilling incident! mother jumped from the window of the burning bus with her sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.