हज टर्मिनलच्या यादीत नाशिकचा समावेश शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:16+5:302021-08-14T04:18:16+5:30
हज यात्रेला जाऊन पुण्य पदरात पाडून घेणे प्रत्येक मुस्लीम बांधवांचे स्वप्न असते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार ...
हज यात्रेला जाऊन पुण्य पदरात पाडून घेणे प्रत्येक मुस्लीम बांधवांचे स्वप्न असते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यातून दरवर्षी १२ ते १५ हजार मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. यासाठीची प्रक्रिया राज्य शासनाने जरी ऑनलाइन केली असली तरी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हज भाविकांना मुंबई येथे तीन ते चार वेळा जावे लागते. कागदोपत्रांची पूर्तता झाल्यानंतर भाविकांना मुंबई विमानतळावरून हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसे आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने हज भाविकांची मोठी कुचंबणा होत आहे. याची दखल घेत नाशिक येथे मिनी हज हाउस व्हावे आणि नाशिक विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी खासदार गोडसे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.