गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकच्या उमेदवारीची गुढी; भुजबळ की गोडसे फैसला
By संजय पाठक | Published: April 6, 2024 09:57 AM2024-04-06T09:57:19+5:302024-04-06T09:58:45+5:30
भाजपाच्या वाऱ्या थांबल्या
संजय पाठक, नाशिक: लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्व चर्चा थांबल्या आहेत. भाजपाची मुंबई वारी देखील थांबली आहे तसेच खासदार हेमंत गोडसे हे देखील नाशकातच आहेत. पुढील गुढीपाडव्याच्या दिवशी उमेदवारीची घोषणा होईल असे हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.
नाशिकच्या उमेदवारीसाठी शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक असून त्यांच्यासह भाजपाने देखील ही जागा मिळावी यासाठी मुंबईत शक्ती प्रदर्शन केले होते. दरम्यान, शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे की राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून या चर्चा अचानक थंडावल्या असून मुंबई वाऱ्या थांबल्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीची यादी घोषित होणार असून त्याशिवाय उमेदवार स्पष्ट होईल असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. अर्थात, नाशिकची जागा शिंदे सेनेलाच मिळेल असे त्यांनी सांगितले.