Nashik: कोटंबी घाटात मालवाहू ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 04:02 PM2023-03-17T16:02:50+5:302023-03-17T16:05:05+5:30

Nashik: नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात एक मालवाहू ट्रक उलटल्याने वाहनासह त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Nashik: Cargo truck overturned at Kotambi Ghat | Nashik: कोटंबी घाटात मालवाहू ट्रक उलटला

Nashik: कोटंबी घाटात मालवाहू ट्रक उलटला

googlenewsNext

- रामदास शिंदे  
पेठ (जि. नाशिक) : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात एक मालवाहू ट्रक उलटल्याने वाहनासह त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर शुक्रवारी (दि.१७) रोजी पहाटेच्या सुमारास गुजरातकडून नाशिककडे माल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक केए- ५६-६७३६ हा ब्रेक फेल झाल्याने अखेरच्या वळणावर संरक्षक भिंत तोडून खाली कोसळला. यामुळे वाहनाची पुढची दोन्ही चाके निखळून पडली. तसेच डिझेल टाकीही फुटल्याने ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रकमध्ये असलेल्या गठ्ठी इतस्ततः विखुरल्या गेल्या. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. कोटंबी घाटातील शेवटचे वळण हे अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Nashik: Cargo truck overturned at Kotambi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.