नाशिक: एच.आय.व्ही सहजीवन जगणाºया बाल-गोपाळांनी केली सप्तरंगांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:21 PM2018-03-07T12:21:54+5:302018-03-07T12:21:54+5:30
नाशिक- रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही. पण त्यांनाही अशा सणांच्या माध्यमातुन आनंद गवसावा, क्षणभर विरंगुळा मिळावा या हेतुने महिंद्रा आणि महिंद्रा लि., यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एच. आय.व्ही सहजीवन जगणाºया बालकांसाठी महिंद्रा हरियाली, सातपूर एम.आय.डी.सी येथे रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. एच.आय.व्ही सारख्या आजाराचे सावट या चिमुकल्यांवर न पडू देता सप्तरंगांच्या रंगांप्रमाणेच या बालकांच्या आयुष्यात चांगल्या आरोग्याचा, हर्षाचा, प्रेमाचा, नवीन उमेदीचा, सकारात्मक दृष्टीचा रंग भरण्याचा प्रयत्न अशा उपक्रमाद्वारे केला जातो आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महिंद्रा आणि महिंद्रा लि. चे मधुकर टर्ले , प्रदीप भट, कमलाकर घोंगडे, आशितोष अग्निहोत्री आण यश फाऊंडेशन अध्यक्ष रवींद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. रंगपंचमी म्हटल कि आपल्या डोळ्यासमोर येणार गोंडस व्यक्तिचित्र म्हणजे राधा-कृष्णाची जोडी. एच.आय.व्ही सहजीवन जगणाºया बालकांनी रंगपंचमीचे औचित्य साधून राधा कृष्णाचा वेश परिधान करून उपस्थित मान्यवरांना रंगाचा टिळा लावून, विविध रंगीबेरंगी फुलांची उधळण करून शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी सर्व बालगोपाळांसोबत कोरड्या रंगांची व फुलांची उधळण करून रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. मधुकर टर्ले यांनी अशा चांगल्या व अनोख्या रंगपंचमी कार्यक्र माला सहभागी केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. कमलाकर घोंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुलांना रंगपंचमीचे महत्त्व व संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. नाशिक जिल्यातील अडिचशेहून अधिक एच.आय.व्ही सहजीवन जगणाºया नागरिकांनी व बालकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.