नाशिक शहराला हवे वाढीव पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 04:08 PM2020-03-18T16:08:14+5:302020-03-18T16:10:44+5:30
नाशिक : महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाशी पाणीपुरवठ्याचा करार करताना शिर्डी नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव पाणी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातील मृत साठा वगळून पाणी आरक्षण मिळावे यासाठीदेखील चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ही माहिती दिली.

२०११ पासून या दोन्ही विभागात करार करण्यात आला नव्हता. आता वार्षिक पाणीपुरवठा करार करण्यात येणार असला तरी दोन वर्षांपूर्वी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निकष बदललेले आहेत. त्यानुसार ज्या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कमी असेल त्या महापालिकेला १३५ लिटर्स दरडाई पाणीपुरवठा या हिशेबाने पाणी आरक्षण मंजूर असून, त्यापेक्षा अधिक पाणी घेतल्यास दीडपट आणि दुप्पट दर आकारण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेची लोकसंख्या ही वीस लाखांपर्यंत आहे. त्यामुळे महापालिकेला सध्या दीडशे लिटर्स दरडोई होणारा पुरवठा कमी करावा लागणार आहे.
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निकष काहीही ठरवले असले तरी त्यांच्याकडे अपील केल्यास त्यात सुुधारणा होऊ शकते.
सर्व नगरपालिकांना एकसारखा निकष लागू केल्यानंतर शिर्डी नगरपालिकेने प्राधिकरणाकडे अपील केले होते. जगभरातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक येतात. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार त्यांचे अपील मान्य करण्यात आले. नाशिकमध्येदेखील कामगार, भाविक आणि पर्यटकांची संख्या अधिक असल्याने तरंगती लोकसंख्या अधिक असल्याने पाणी वाढवून मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाकडे तशी मागणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.