महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीचे शहर नाशिक; हंगामातील निचांकी १०.२ किमान तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:12 PM2017-11-30T14:12:07+5:302017-11-30T16:30:49+5:30

गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आहे.

Nashik: The coldest city in Maharashtra Top 10.2 Minimum Temperature Record in the Season | महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीचे शहर नाशिक; हंगामातील निचांकी १०.२ किमान तापमानाची नोंद

महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीचे शहर नाशिक; हंगामातील निचांकी १०.२ किमान तापमानाची नोंद

Next
ठळक मुद्देशहराचे किमान तपमान सकाळी १०.२ अंश तापमानाचा पारा पंधरवड्यापुर्वी १०.४ अंशापर्यंत आला होता.

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक शहराचा किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे शहर गारठले आहे. महिनाअखेर गुरूवारी (दि.३०) शहराचे किमान तपमान सकाळी १०.२ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक थंडी पुन्हा नाशिकला परतली आहे. या महिन्यात दुस-यांना नाशिकला थंडीचा कडाका जाणवला आहे. १२ नोव्हेंबर रोजी शहराचे तापमान १०.४ अंशावर घसरले होते.
एकूणच सातत्याने घसरत असलेल्या तापमानामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद गुरूवारी झाली. यापुर्वीदेखील तापमानाचा पारा पंधरवड्यापुर्वी १०.४ अंशापर्यंत आला होता. शहरात वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत असून नोकरदार वर्ग दिवसाही कार्यालयात हाफ स्वेटरचा वापर करताना दिसून येत आहेत. तसेच महिलावर्गही स्वेटर, शॉलचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.

बॉडी लोशन, पेट्रोलियम जेली यांसारख्या क्रीमचा वापर वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे आणि वातावरणातील आद्रतेमध्ये होणाऱ्या घटामुळे त्वचा तडकण्याची समस्या निर्माण होते. त्यापासून बचावासाठी नागरिकांकडून बॉडीलोशनसारख्या मॉश्चराईजर क्रीमला मागणी वाढली आहे.नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून, नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.


गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आहे. हंगामातील हे सर्वांत निचांकी किमान तापमान नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेपासून ज्यांची दिनचर्या सुरू होते अशा घटकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागला. दूधविक्रेते, पेपरविक्रेते, विविध गुणकार रसविक्रेत्यांसह सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते. एकूणच वाढत्या थंडीमुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकवरील सकाळी फेरफटका        मारणा-यांची संख्या रोडावल्याचे चित्र आज बघावयास मिळाले.



प्रमुख शहरांचे किमान तपमान (अंशामध्ये)
सातारा १३.७, महाबळेश्वर १४.२, अहमदनगर १०.९, जळगाव १२.०, सातारा १३.७, मालेगाव १३.५, नागपूर १२.५, अकोला १४.०, सांगली १६.८, औरंगाबाद १२.८

Web Title: Nashik: The coldest city in Maharashtra Top 10.2 Minimum Temperature Record in the Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक