राज्यात नाशिक सर्वांत थंड

By admin | Published: January 4, 2017 12:00 AM2017-01-04T00:00:30+5:302017-01-04T00:00:45+5:30

पारा ८.८ अंश : राज्यात नीचांकी तपमानाची नोंद

Nashik is the coldest state in the state | राज्यात नाशिक सर्वांत थंड

राज्यात नाशिक सर्वांत थंड

Next

नाशिक : थंडीच्या हंगामातील नाशिकचे सर्वांत नीचांकी तपमान १० डिसेंबरला ७.५ अंश इतके नोंदविले गेले होते. मंगळवारी (दि.३) शहराच्या किमान तपमानाचा पारा थेट ८.८ अंशांवर घसरल्याने राज्यात सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद नाशिकला करण्यात आली. सोमवारी तपमानाचा पारा दहा अंशांवर होता. एका दिवसात अचानकपणे दोन अंशांनी किमान तपमान घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.  नोव्हेंबर महिन्यापासून नाशिक राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून आघाडीवर होते. मंगळवारी (दि.३) शहराचे किमान तपमान ८.८ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात नाशिकला सर्वांत कमी नीचांकी तपमानाची नोंद मंगळवारी हवामान खात्याने केली. शहरात थंडीची लाट पुन्हा आली असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.  एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट झाल्याने नाशिककरांना पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. एक ा दिवसात दोन अंशाने पारा घसरण्याची हंगामातील ही पहिलीच वेळ असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. वातावरणात होणारा बदल आणि एकूणच जानेवारीअखेरपर्यंत थंडीचा कडाका वाढू शकतो. ढगाळ हवामान कमी झाल्यास शहराच्या किमान तपमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)



 

Web Title: Nashik is the coldest state in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.