‘इंडियन सायकल डे’च्या अधिकृत मान्यतेसाठी नाशिकचे सायकलपटू पुन्हा करणार नाशिक-मुंबई सायकल वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 10:16 PM2017-09-24T22:16:02+5:302017-09-24T22:22:01+5:30
गोल्फ क्लब मैदान येथून रविवारी सुरू झालेली ही रॅली घोटी, कसारा, शहापूर मार्गे गेल्यानंतर भिवंडी फाटा येथे मुक्कामी राहणार आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता रॅलीचे ठाणे, घाटकोपर,दादर, भायखळा, फोर्ट मार्गे गेट वे आॅफ इंडिया असा या रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविण खाबिया यांनी दिली.
नाशिक : महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २) महात्मा गांधी जयंती ‘इंडियन सायकल डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान, नाशिक ते मुंबई अशी सायकल वारी सायकलपटू करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन मागील सहा वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करत आहे. या सायकल प्रवासा दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत तसेच स्वच्छता आणि नागरी कर्तव्य आदिंचा संदेश देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाशिक सायकलिस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ‘स्वच्छ भारत - हरीत भारत’ हा संदेश घेऊन नाशिक ते मुंबई अशा सायकल प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन सायकल डे च्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. १) सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून या रॅलीला सुरूवात होणार आहे.
गोल्फ क्लब मैदान येथून रविवारी सुरू झालेली ही रॅली घोटी, कसारा, शहापूर मार्गे गेल्यानंतर भिवंडी फाटा येथे मुक्कामी राहणार आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता रॅलीचे ठाणे, घाटकोपर,दादर, भायखळा, फोर्ट मार्गे गेट वे आॅफ इंडिया असा या रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविण खाबिया यांनी दिली. संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सायकल चळवळ अधिकाधिक बळकट करण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण खाबिया, किरण चव्हाण, राजेंद्र वानखेडे, नितीन भोसले, डॉ. मनीषा रौदळ आदि उपस्थित होते.