नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची खो-खोपटू कन्यांना सायकलींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:20+5:302021-08-22T04:17:20+5:30
नाशिक : गत चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या खो-खो प्रबोधिनीच्या मुलींसाठी भविष्यातील प्रगतीसाठी नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनतर्फे १० सायकल्सची भेट देण्यात ...
नाशिक : गत चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या खो-खो प्रबोधिनीच्या मुलींसाठी भविष्यातील प्रगतीसाठी नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनतर्फे १० सायकल्सची भेट देण्यात आली.
सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील असलेल्या या खो-खो प्रबोधिनीच्या मुलींनी शिक्षणासाठी श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश घेतला आहे. हॉस्टेलपासून हे अंतर थोडे लांब असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांना कळविण्यात आली. त्यानंतर नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष वानखेडे यांनी त्वरित दखल घेऊन नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या खेळाडूंना खो-खो प्रबोधिनीतील मुलींसाठी सामाजिक बांधिलकीपोटी १० सायकल्सची भेट खेळाडूंना देत असल्याचे सांगून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेमार्फत सचिव उमेश आटवणे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. खेळाडूंतर्फे कौशल्या पवार हिने आम्ही भविष्यात अभ्यास व खेळात प्रगती करण्यासाठी सर्वर्थाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सिमाली नाईक, सायक्लिस्ट संघटनेच्या सचिव डॉ. मनीषा रौंदळ, रवी दुसाने आणि खो-खो प्रबोधिनीचे संस्थापक आणि विद्यार्थिनीचे पालक मंदार देशमुख उपस्थित होते.
इन्फो
नाईक यांच्याकडून ५ सायकल्स
प्रबोधिनीतील अन्य ५ कन्यांसाठी अजून ५ सायकलींची गरज होती. ही गरज ओळखून सिमाली रवींद्र नाईक यांनी अन्य ५ मुलींना सायकल भेट दिली. पालकत्व हे फक्त शब्दातून नव्हे तर ती कृतीतून व्यक्त करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.
फोटो
२१सायकल्स