नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 08:45 PM2020-02-29T20:45:22+5:302020-02-29T20:50:10+5:30
शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.परीक्षेची तयारी अंतिम टप्यात असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली.
विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला दिशा देणारी दहावीची परीक्षा अवघ्या अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शिक्षण मंडळाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मागील वर्षी नाशिक विभागातून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. या पार्श्वभूमीवर गैरमार्गाची शक्यता असलेल्या केंद्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
मंगळवारी प्रथम भाषेचा पेपर
मंगळवारी सकाळ सत्रात ११ ते २ यावेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी तर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ६ यावेळेत जर्मन आणि फ्रेंच विषयाचा पेपर होईल. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहि तीसाठी देण्यात आली आहे. परीक्षेपुर्वी शाळांकडे देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानुसार परीक्षा द्यावी, इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन परीक्षा विभागातर्फे करण्यात आले आहे.