नाशिक धुळे सीमा दगडी टाकून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 03:58 PM2020-04-12T15:58:17+5:302020-04-12T15:59:43+5:30
जायखेडा : मालेगाव पाठोपाठ धुळे येथे कोरोना बाधित रु ग्णाचा मृत्यू व लागण झालेल्यांची संख्या वाढताच परिसरातील गावे अधिकच सतर्क झाली आहेत.
जायखेडा : मालेगाव पाठोपाठ धुळे येथे कोरोना बाधित रु ग्णाचा मृत्यू व लागण झालेल्यांची संख्या वाढताच परिसरातील गावे अधिकच सतर्क झाली आहेत. जायखेडा गावापासून जवळच असलेल्या व नाशिक - धुळे जिल्ह्यांना जोडणारा व साक्र ी मार्गे धुळ्यात जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग म्हणून वापरला जाणारा सीमेवरील पिसोळबारी मार्ग नांदीन ग्रामपंचायतने जेसीबीच्या साह्याने मोठे दगड टाकून बंद करून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात येण्यासाठी व धुळे जिल्ह्यात जाण्यासाठी सोपा मार्ग असल्याने याचा वापर होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नांदीनकरांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात असेच खबरदारीचे उपाय करण्यात येत असून, गावात येणारे रस्ते हि काटेरी झुडुपे व दगड टाकून बंद करण्यात आले आहेत. मालेगाव शहर जवळच असल्याने येथून कोणीही येऊ नये यासाठी अधिक खबरदारी घेतली जात असून, गावा गावात जागता पहारा सुरु आहे.