नाशिक मध्ये दोन हात नाही म्हणून त्याने पायाने केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 04:44 PM2019-10-21T16:44:19+5:302019-10-21T16:51:53+5:30
नाशिक- दोन हात नाही म्हणून तो हारला नाही की डगमगला नाही. संसाराचा गाडा तसाच हाकत असताना त्याने मतदानाचे पवित्र कर्तव्य टाळले नाही. मंगळवारी (दि.२१) शिंगवे बहुला येथे मतदानासाठी आल्यानंतर मतदान अधिकारी बुचकळ्यात पडले, मतदान कसे करणार? परंतु त्याने चक्क पायाने मतदान केले आणि निवडणूक कर्मचाऱ्याने त्याच्या पायाच्या बोटाला शाई लावली आणि मतदानाची कार्यवाही पूर्ण केली.

बाजीराव नामदेव मोजाड असे त्याचे नाव. देवळाली मतदार संघातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकरी असल्याने जोडीला अनेक कामे ते करतात. २००८ मध्ये गहु कापणीच्या मशिनवर काम करताना अपघात घडला आणि त्यांचे दोन्ही हात गेले. परंतु ते जिद्दीने काम करीत आहेत. हात गमावल्यानंतर तसे त्यांनी मतदान केले नव्हते. मात्र यंंदा देवळाली मतदार संघात त्यांनी मतदान करण्याचाच निर्धार केला. गावातील हायस्कूलमध्ये ते दुपारी मतदानासाठी गेले. त्यावेळी हात नसल्याने मतदान कसे करणार असा प्रश्न मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना विचारला आणि मदतनीस देऊ केला. परंतु मोजाड यांनी हाताने नाही तर पायाने मतदान करणार असे सांगितले आणि त्यानुसार मतदान केले. मतदान कर्मचाºयाने देखील मग त्यांच्या पायाच्या बोटाला शाई लावली.
मतदान हे राष्टÑीय कर्तव्य असल्याने ते प्रत्येक निवडणूकीत पार पाहिजे. परंतु त्यानंतर देखील अनेक धडधाकट नागरीक मतदान करण्यास उत्सूक नसतात. परंतु येथे हात नाही म्हणून कारण पुढे न करताच बाजीराव मोजाड यांनी मतदान करून धडधाकटांपुढे आदर्श ठेवला आहे.