नाशिक जिल्ह्यात ७२ लाख वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 09:50 PM2018-06-29T21:50:50+5:302018-06-29T21:56:41+5:30
नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव (कश्यपी धरणासमोरील डोंगर) येथील वनजमिनीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी (दि़ १) सकाळी ९ वाजता होणार आहे़

वनविभागाने वृक्षलागवडीसाठीची तयारी पूर्ण केली असून, खड्डे खोदण्याचे कामही पूर्ण झाले आहे. एकूण वृक्षलागवडीपैकी वनविभाग ४७ लाख ६० हजार, ग्रामपंचायत १५ लाख ८ हजार, तर इतर शासकीय यंत्रणा ९ लाख ५८ हजार वृक्षलागवड करणार असल्याची माहिती नाशिकच्या पश्चिम भाग उपवनसंरक्षक टी़ब्युला एलील मती यांनी पत्रकार परिषदेत दिली़
वृक्षलागवडीसाठी वनविभागाच्या ७० रोपवाटिकेत १ कोटी २३ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. वृक्षलागवड कार्यक्र मानंतर उरणारी रोपे पुढील वर्षांच्या वृक्षलागवड कार्यक्र मात उपयोगात आणली जाणार आहेत. तसेच ‘रोपे आपल्या दारी’ उपक्र मांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, मनमाड आदी विविध ठिकाणी कक्ष उभारून नागरिकांना अल्पकिमतीत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़
वृक्षलागवडीसाठी हरितसेना सदस्य नोंदणी सुरू असून, वनविभागाच्या ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर याबाबतची माहिती आहे. हरितसेनेअंतर्गत नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेल्या तीन लाख ७३ हजार ५०० सदस्य नोंदणीपैकी २ लाख ८० हजार ९६२ सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे़
गतवर्षी चार कोटी वृक्षलागवड कार्यक्र मांतर्गत जिह्यात एकूण ४३ लाख ८ हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी वनविभागाने लावलेली ९६ टक्के, तर इतर यंत्रणांनी लावलेली ७५ टक्के जिवंत रोपांची टक्केवारी आहे. नाशिक तालुक्यातील धोंडेगाव येथे होणाऱ्या वृक्षलागवड कार्यक्रमासाठी पालकमंत्री, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे उपवनसंरक्षक टी़ब्युला एलील मती यांनी सांगितले़