अपशकुनी खुर्ची बदलून नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांनी स्वीकारली सुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:36 PM2018-02-08T15:36:57+5:302018-02-08T15:39:25+5:30
रिझर्व्ह बॅँकेच्या सुचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देत
नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरूवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरूवात केली. बॅँकेचे अध्यक्ष म्हणून सुत्रे ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसातच बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने अध्यक्षपदाची खुर्चीला अपशकूणी ठरवून अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी जुनी खुर्ची दालनाबाहेर काढून नवीन खुर्चीवर बसत नव्या ‘ईनिंग’ला प्रारंभ केला.
रिझर्व्ह बॅँकेच्या सुचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देत संचालकांना बॅँकेचे नियमीत कामकाजात सहभागी होण्याची मुभा दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या संचालकांना बुधवारी सायंकाळी आदेशाची प्रत मिळाल्यावर गुरूवारी दुपारी दोन वाजता अध्यक्ष केदा अहेर, उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह संचालकांनी जिल्हा बॅँकेत प्रवेश केला. यावेळी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर करून केदा अहेर यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी आमदार सीमा हिरे, डॉ. शोभा बच्छाव, शिरीष कोतवाल, परवेज कोकणी, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, संदीप गुळवे, किशोर दराडे, धनंजय पवार हे संचालक उपस्थित होते. संचालकांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच बॅँकेचे शाखाधिकारी, खातेप्रमुखांची बैठकही घेण्यात आली व त्यात बॅँकेच्या वसुलीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.