शेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त नाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:55 PM2017-11-23T23:55:05+5:302017-11-24T00:00:48+5:30

नाशिक : राज्य सरकारकडून शेतकºयांंना दीड लाखांच्या आत जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खाती जमा करण्यास मुहूर्त सापडला असून, जिल्ह्णातील पहिल्या टप्प्यातील ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या नावे असलेली तीन कोटी ६० लाखांची कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅँकेने कर्जमाफीच्या खात्यात जमा केली आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने रविवारी (दि.१९) यासंंदर्भात राज्यभरातील शेतकºयांच्या कर्जमाफीचे सविस्तर वृत्त प्रकाशित करून ‘कर्जमाफी कागदावरच’ असे वृत्त व एक सविस्तर विशेष पान प्रकाशित करून राज्यभरातील कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली होती.

Nashik district bank has got a loan of Rs 3.5 crore for the loan disbursal of farmers. | शेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त नाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळी

शेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त नाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळी

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळीशेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त

नाशिक : राज्य सरकारकडून शेतकºयांंना दीड लाखांच्या आत जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खाती जमा करण्यास मुहूर्त सापडला असून, जिल्ह्णातील पहिल्या टप्प्यातील ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या नावे असलेली तीन कोटी ६० लाखांची कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅँकेने कर्जमाफीच्या खात्यात जमा केली आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने रविवारी (दि.१९) यासंंदर्भात राज्यभरातील शेतकºयांच्या कर्जमाफीचे सविस्तर वृत्त प्रकाशित करून ‘कर्जमाफी कागदावरच’ असे वृत्त व एक सविस्तर विशेष पान प्रकाशित करून राज्यभरातील कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली होती. त्याचा परिणाम होऊन ३१ आॅक्टोबर २०१७ पासून जिल्हा बॅँकेत जमा असलेली ८७९ शेतकºयांची तीन कोटी ७९ लाखांची कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅँकेच्या कर्ज खात्यात जमा होण्यास विलंब लागत होता. अखेर गुरुवारी (दि.२३) ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या कर्जमाफीची तीन कोटी ७० लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेने कर्ज खात्यात वर्ग केली. तत्पूर्वी तालुका स्तरावरील समितीकडून कर्जमाफीची नावे व आकडेवारी यांचा ताळमेळ असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर ८३७ शेतकºयांच्या कर्जमाफीला मुहूर्त सापडला आहे. नाशिकमध्ये कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख ६० हजारांहून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा विचार करता जिल्हा बॅँकेने दीड लाखांच्या आतील सुमारे ९० हजार तसेच दीड लाखांच्या पुढील मात्र कर्जमाफीस पात्र अशा सुमारे २८ ते ३० हजार व नियमित कर्जफेड करणाºया २० हजारांहून अधिक अशा सुमारे १ लाख ३८ हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी १ ते ६६ विहित नमुन्यात माहिती मुंबईला पाठविली होती. ३१ आॅक्टोबरला शासनाने नाशिक जिल्हा बॅँकेत ८७९ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी सुमारे तीन कोटी ७० लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेत वर्ग झाली होती.
होती तांत्रिक अडचण
जिल्हा बॅँकेत कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे समोेर होते. शासनाच्या निर्देशानुसार एकाच कुटुंबात दीड लाखांच्या वर कर्जमाफीची रक्कम देता येत नसताना काही कुटुंबांच्या नावे १ लाख ९० हजारांच्या आसपास रक्कम दिसत होती. शेतकºयांच्या नावांमध्ये व आडनावांमध्ये गफलत असल्याने जिल्हा बॅँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. आता तालुका स्तरावरील समितीचा अहवाल आल्याने अडचण दूर झाली.होती तांत्रिक अडचण
जिल्हा बॅँकेत कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे समोेर होते. शासनाच्या निर्देशानुसार एकाच कुटुंबात दीड लाखांच्या वर कर्जमाफीची रक्कम देता येत नसताना काही कुटुंबांच्या नावे १ लाख ९० हजारांच्या आसपास रक्कम दिसत होती. शेतकºयांच्या नावांमध्ये व आडनावांमध्ये गफलत असल्याने जिल्हा बॅँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. आता तालुका स्तरावरील समितीचा अहवाल आल्याने अडचण दूर झाली.

Web Title: Nashik district bank has got a loan of Rs 3.5 crore for the loan disbursal of farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक