नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना खेळण्यातील गाडी भेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:36 PM2018-05-23T14:36:51+5:302018-05-23T14:36:51+5:30
भाजपा सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. पण मात्र नंतर महागाई कडे दुर्लक्ष केले. सर्व क्षेत्रात महागाईच्या खाईत जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक इंधन दरवाढीचा फटका बसत
नाशिक : राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे इंधन दरवाढीचा निषेध म्हणून जिल्हाधिका-यांना खेळण्यातील गाडी भेट देवून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, भाजपा सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. पण मात्र नंतर महागाई कडे दुर्लक्ष केले. सर्व क्षेत्रात महागाईच्या खाईत जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक इंधन दरवाढीचा फटका बसत असल्याने संपूर्ण कुटुंबाला आर्थिक झळ बसत आहे. संपूर्ण देशात नासिक मध्ये पेट्रोल ८५.०७ पैसे तर डिझेल ७१.६६ पैसे दराने विक्री होत आहे. यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन इंधनावरील अवाजवी सेस अधिभार रद्द करून मूळ कक्षेत आणावा. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहरातील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध म्हणून लहान मुलांची खेळण्यातील गाडी (खेळणी) सरकारला भेट देण्यात आली. यावेळी उप जिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अनिता भामरे, सुषमा पगारे, समिना मेमन, हिना शेख, पुष्पा राठोड,संगिता गांगुर्डे, सलमा शेख, प्रतिभा भुजबळ, संगिता अहिरे, पुनम शाह, दिपा सोळंकी,सुजाता कोल्हे,मिनाक्षी गायकवाड आदि महिला उपस्थित होत्या.