नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्सचे जेलभरो ; सव्वातीनशे आंदोलक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 03:39 PM2019-03-07T15:39:30+5:302019-03-07T15:43:19+5:30
देशातील ईपीएस ९५ अंर्तर्गत कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन वाढीबाबत सत्ताभारी भाजपा सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत पेन्शनर्सला किमान ९ हजार अधिक महागाई भत्ता पेन्शन मिळावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनतर्फे गुरुवारी (दि. ७)गोल्फ क्लब मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
नाशिक : देशातील ईपीएस ९५ अंर्तर्गत कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन वाढीबाबत सत्ताभारी भाजपा सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत पेन्शनर्सला किमान ९ हजार अधिक महागाई भत्ता पेन्शन मिळावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनतर्फे गुरुवारी (दि. ७)गोल्फ क्लब मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
डॉ. कोशीयारी यांच्या अध्यक्षतेतील समितीच्या २०१३मधील अहवालानुसार ईपीएस ९५ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनर्सना किमान तीन हजार पेन्शन अधिक महागाई भत्ता देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याआधारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी ईपीएस ९५ च्या पेन्शनर्सना सत्तेवर आल्यास तीन हजार पेन्शन अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु भाजपा सरकारचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आला असतानाही त्यांनी आश्वासन पाळले नसल्याचा आरोप पेन्शनर्सनी केला आहे. सरकारने डॉ. कोशीयारी समितीचा अहवाल हातात असतानाही उच्चस्तरीय समिती नियुक्त करीत समितीच्या अहवालानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत सरकार पेन्शनधारकांची फसवणूक करीत असल्याच्या घोषणा देत पेन्शनधारकांनी दिल्या. आमदार खासदारांना पेन्शन, कष्टकरी कामगारांना का नाही असा सवाल करीत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी सुमारे सव्वा तीनशे आंदोलकांना ताब्यात घेतल्े. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील बराक क्रमांत १७ मध्ये काही वेळ ठेवल्यानंतर सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले.या आंदोलनता संघटनेचे अध्यक्ष राजू देसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजू देसले, जिल्हा सचीव बी.डी. जोशी, कार्याध्यक्ष चेतन पणेर, सुभाष काकड, शिवाजी शिंदे, बापू रांगणेकर,शिवाजी ढोबळे, नामदेव बोराडे, प्रकाश नाईक आदि सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या प्रकृतीत बिघाड
कोशीयारी समितीच्या शिफारशीनुसार पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना उन्हाच्या चटका जाणवत असल्याने काही आंदोलकांच्या प्रकृतीत बिघाड झाला. यातील दोन आंदोलकांना आंदोलनस्थळी भोवळ आल्याचा प्रकार घडला. यातील प्रकाश नाईक अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अशून अन्य आंदोलकांना प्रथोमपचारानंतर प्रकृतीत सुधारणा वाटल्याने त्यांनी जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान,पोलीस प्रशासनाने माणुस्कीचे दर्शन घडवत ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना दुपारचे भोजन उपलब्ध करून दिल्याने त्यांना निमित औषधे घेता आल्याने आंदलकनी आंदोलनादरम्यान पोलीसांचे सहकार्य लाभल्याची भावना व्यक्त केली.
आंदोलकांच्या मागण्या
इपीएफ पेन्शनर्सला किमान ९ हजार अधिक महागाई भत्ता स्वरुपात पेन्शन मिळावी,त्याचप्रमाणे अंतरिम दिलासा म्हणून तीन हजार पेन्शन अधिक महागाई भत्ता या स्वरुपात पेन्शन देण्यात यावी, यासह २००५नंतर सेवानिवृत्ती शिवाय अन्य कारणाने नोकरी सोडणाºया सर्व कर्मचाऱ्यांना टू इअर वेटेज मिळावे, उच्च वेतन उच्च पेन्शन सुरू करण्यासोबतच पेन्शनर्सला मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले.