नाशिक जिल्हा फेडरेशनचा मोर्चा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:51+5:302021-03-10T04:15:51+5:30
दुपारच्या सुमारास रस्ते सुनसान नाशिक : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. या ...
दुपारच्या सुमारास रस्ते सुनसान
नाशिक : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले असून तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
आरटीओ कॉर्नरला वाढला भाजीबाजार
नाशिक : आरटीओजवळील कॅन्सर हॉस्पिटल कॉर्नरवर भरणारा भाजीबाजार दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात महापालिकेचे भाजी मार्केट असावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. आता रस्त्यावर भरणारा भाजीबाजारही वाढत असल्याने परिसरात लवकरच भाजी मार्केट तयार करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महामार्ग ओलांडणे झाले जिकिरीचे
नाशिक : मुंबई महामार्गावरील द्वारका ते पाथर्डी फाटा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक आणि रहिवासी क्षेत्र आहे. त्यामुळे नागरिकांना अनेकदा रस्ता ओलांडावा लागतो. महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये महामार्गावरील अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.
ऊन वाढल्याने विजेचा लपंडाव
नाशिक : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने अघोषित भारनियमन करण्याची वेळ येते. राज्यात विजेची पुरेशी निर्मिती होत असल्याचे सांगितले जात असले तरी अनेकदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीजुपरवठा खंडित केला जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
द्वारका चौकात दुचाकीस्वारांकडून नियमभंग
नाशिक : द्वारका चौकातून येणारे दुचाकी वाहनधारक शंकरनगरकडे जाताना द्वारका हॉटेलशेजारील सर्व्हिस रोडने जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनधारकांना अडथळा होत आहे. सिग्नल लागल्यानंतर वाहने या चौकात उभी राहतात. अशा वेळी पलीकडून सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार सर्व्हिस राेडने जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.