नाशिक जिल्हा रुग्णालय : ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 06:17 PM2018-04-25T18:17:51+5:302018-04-25T18:17:51+5:30

वैद्यकिय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणा-याला वैद्यकिय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध

Nashik District Hospital: 'Harale doctor, Harlee science winner Mantrik ...' | नाशिक जिल्हा रुग्णालय : ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक...’

नाशिक जिल्हा रुग्णालय : ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक...’

Next
ठळक मुद्दे ‘आता रोगावर इलाज, लिंबू-मिरची, कशाला पाहिजे इंजेक्शन, औषधाला खर्ची’ ‘आप’च्या आंदोलनकर्त्यांच्या गळ्यात लिंबू-मिरचीच्या माळा

नाशिक : राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणा-याला वैद्यकिय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध म्हणून आम आदमी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले.
येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयामध्ये येणा-या रु ग्णांवर वैद्यकीय उपचार न करता, त्यांच्यावर तंत्र-मंत्राद्वारे, राशींच्या खड्यांद्वारे उपचार करण्यात यावे, अशी उपरोधिक मागणीही ‘आप’च्या पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात लिंबू-मिरचीच्या माळा घालून जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. राशींच्या खड्यांत स्वारस्य दाखिवणा-या वैद्यकिय अधिका-याच्या कृतीचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलकांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक, कधी होणार सज्ञान? असा प्रश्नही एका फलकाद्वारे उपस्थित केला. तसेच ‘आता रोगावर इलाज, लिंबू-मिरची, कशाला पाहिजे इंजेक्शन, औषधाला खर्ची’ अशा घोषणांचे फलकही झळकविले.
आंदोलनात जितेंद्र भावे, जसबीर सिंग, विनायक येवले, गिरीश उगले आदी सहभागी झाले होते. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गजानन होले यांनी निवेदन स्विकारुन संबंधितांची चौकशी सुरू झाली असून त्याद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी जिल्हा रुग्णालयातील अपुरा वैद्यकिय कर्मचारी वर्गाबाबतही होले यांनी लवकरच भरती प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
--

Web Title: Nashik District Hospital: 'Harale doctor, Harlee science winner Mantrik ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.