Nashik District Nagar Panchayat Result: नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे, डॉ. भारती पवार, दिलीप बनकर 'गपगार'; नगरपंचायती हातच्या गेल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:00 PM2022-01-19T13:00:41+5:302022-01-19T13:04:18+5:30
Nashik District Nagar Panchayat Result: निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून भाजपला धक्का बसला आहे. पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. या सहापैकी भाजपकडे २, राष्ट्रवादीकडे २, शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी १ नगरपंचायत आली आहे.
निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून भाजपला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का दिला असून निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का, राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. कृषीमंत्री दादा भुसे, भाजपच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे.
निकाल खालीलप्रमाणे
सुरगाणा नगरपंचायत
भाजपचं वर्चस्व, सेनेला धक्का
एकूण जागा - 17
शिवसेना - 06
भाजप - 08
माकप - 02
राष्ट्रवादी काँग्रेस - 01
देवळा नगरपंचायत
भाजपचा एकहाती विजय
एकूण जागा - 17
भाजप - 15
राष्ट्रवादीला - 2
निफाड नगरपंचायत
भाजपची सत्ता उलथवली, शिवसेनेचा भगवा फडकला
एकूण जागा - 17
शिवसेना- 07
राष्ट्रवादी काँग्रेस- 03
काँग्रेस - 01
शहर विकास आघाडी - 04
बसपा- 01
इतर(अपक्ष)-01
कळवण नगरपंचायत
राष्ट्रवादीचं वर्चस्व, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना धक्का
एकूण जागा - 17
राष्ट्रवादी - 09
भाजप - 02
काँग्रेस - 03
शिवसेना - 02
मनसे - 01
दिंडोरी नगरपंचायत
शिवसेनेला सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीकडे सत्ता
एकूण जागा - 17
राष्ट्रवादी - 05
शिवसेना - 06
काँग्रेस - 02
भाजपा - 04
पेठ नगरपंचायत
सेनेचं वर्चस्व संपुष्टात, राष्ट्रवादीकडे सत्ता
एकूण जागा - 17
राष्ट्रवादी - 08
शिवसेना - 04
माकप - 03
भाजप - 01
अपक्ष - 01