नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेत ‘परिवर्तन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:12 AM2019-01-22T01:12:18+5:302019-01-22T01:12:37+5:30

नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन’ने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले

 Nashik District Police Co-operative Credit Society 'Transition' | नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेत ‘परिवर्तन’

नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेत ‘परिवर्तन’

googlenewsNext

पंचवटी : नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन’ने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. प्रगती, परिवर्तन तसेच सहकार या तीन पॅनलमध्ये लढत होती. पतसंस्थेत ‘परिवर्तन’ घडल्याचा जल्लोष पोलिसांनी गुलाल उधळून केला.
हिरावाडीरोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात सोमवारी (दि.२१) मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीसाठी सात टेबल मांडण्यात येऊन प्रत्येक टेबलवर चार अशा सुमारे २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्यांदाच पोलीस सहकारी पतसंस्थेसाठी मतदान घेण्यात आले. रविवारी जिल्हाभरात वीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रि या पार पडली होती. या निवडणुकीत ६३.३२ टक्के इतके मतदान झाले होते. २९७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ‘परिवर्तन’ला क ौल दिला.
या निवडणुकीसाठी नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलीस दलातील पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, वाहतूक शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र पोलीस अकादमी अशा विभागात काम करणारे पोलीस कर्मचारी रिंगणात उतरलेले होते. पोलिसांसाठी पोलिसांची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे अवघ्या पोलीस दलाचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले होते.
सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी संपली. निवडणुकीतील विजयी उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन काकड यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष पोलिसांकडून करण्यात आला.
शहर विरुद्ध ग्रामीण लढत
नाशिक जिल्हा पोलीस क्रेडिट को-आॅप. सोसायटी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शहर पोलीस दल विरुद्ध ग्रामीण पोलीस दल अशीच काहीशी लढत झाल्याचे बोलले जात आहे. परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून प्रगती व सहकार पॅनलचा पराभव केला. परिवर्तन पॅनलमध्ये असलेले निम्म्याहून अधिक उमेदवार मखमलाबाद गावातील आहेत. विशेष म्हणजे अनेक उमेदवार हे पदवीधर तसेच उच्च पदवीधर आहेत.
उमेदवारनिहाय मिळालेली मते
सर्वसाधारण गट- कडाळे विक्रम निवृत्ती १४८८, खांडबहाले विनोद दिनकर- १३६९, गवळी समाधान मधुकर- १६२०, गायकवाड प्रकाश गणपत- १३१९, घाडगे सतीश सुभाष- ११५४, चासकर विक्रम पंडित- १२०३, ढिकले कपालेश्वर बहिरू- १५३९, तुपलोंढे हेमंत काशीनाथ- १३७५, पिंगळे गणेश अशोक- १४४१, सपकाळे संजय धनसिंग- १०५६
४इतर मागास प्रवर्ग- नेरकर सचिन रामदास- १३३२
४भटक्या विमुक्त जाती- कातकडे नीलेश चंद्रकांत- १४५५
४अनुसूचित जाती जमाती- महाले हनुमंत हिरामण- १३६२
४महिला राखीव- काकड योगीता गणपत- १७३३, काथवटे सोनम कृष्णा- १३६५

Web Title:  Nashik District Police Co-operative Credit Society 'Transition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.