नाशिक जिल्ह्यात पहिल्या दोन तासात साडे पाच टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 11:13 AM2019-10-21T11:13:32+5:302019-10-21T11:17:13+5:30
नाशिक- नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मतदारांचा उत्साह अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी मतदारांचा उत्साह असून पहिल्या दोन तासात ५.५ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदार संघात १३.११ टक्के झाला असून सर्वात कमी मतदान नाशिक पश्चिम मतदार संघात ३.६ टक्के इतके मतदान झाले आहे.
नाशिक-नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मतदारांचा उत्साह अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी मतदारांचा उत्साह असून पहिल्या दोन तासात ५.५ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदार संघात १३.११ टक्के झाला असून सर्वात कमी मतदान नाशिक पश्चिम मतदार संघात ३.६ टक्के इतके मतदान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकुण पंधरा मतदार संघ असून सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. शहरी भागातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळी पावणे सात वाजेपासूनच रांगा लागल्या होत्या. मतदान याद्यांमध्ये नाव पत्ता शोधण्यासाठी अनेकांनी बीएलओ आणि कार्यकर्त्यांची मदत घेतली तर काहींनी मोबाईल बरोबर आणून त्यातील लिंकव्दारे मतदान केंद्र शोधून काढले. सकाळी दहा वाजेनंतर मतदान केंद्रात गर्दी वाढत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरीक आणि दिव्यांगांनी सकाळीच मतदान उरकून घेतले. अनेक शासकिय अधिकाऱ्यांचा देखील त्यात समावेश होता.
सकाळी सात ते नऊ या दोन तासात साडे पाच टक्के मतदान झाले आहे. यात चांदवड- देवळा विधान सभा मतदार संघात ५.२९ टक्के, निफाड मतदार संघात ५.४६ टक्के, दिंडोरीत १३.११ टक्के, मालेगाव मध्ये ८.२ टक्के, कळवण सुरगाणा मतदार संघात ८.७४ टक्के, बागलाण ३.७८ टक्के, सिन्नर ३. ११ टक्के, नाशिक पश्चिम मतदार संघात ३.६ टक्के या प्रमाणे मतदान झाले.