नाशिक जिल्ह्यातील डाकपालांचा महामेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:47 PM2019-03-13T17:47:11+5:302019-03-13T17:48:03+5:30
सिन्नर : नाशिक जिल्हयातील शाखा डाकपाल यांचा डाक महामेळावा क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र उपनगर येथे उत्साहात पार पडला. नवी मुंबई रिजनच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
सरकारी यंत्रणेतील एकमेव पोस्ट विभाग हा सर्वदूर व ग्रामीण तसेच शहरी भागात पोहोचलेली यंत्रणा आहे. बदलत्या काळानुसार पोस्टाने देखील स्वत:ला बदललेले आहे. नव नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. कोर बँकिंग प्रणाली, दर्पण प्रोजेक्ट, इंडिया पोस्ट, पेमेंट बँक यामुळे ग्राहकांना तत्पर व कटिबद्ध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. भविष्यात कॅशलेस इकॉनॉमी व नागरिकांमध्ये आर्थिक साक्षर बनवण्यात पोस्टाचे मोठे योगदान राहण्यार असल्याचे शोभा मधाळे यांनी सांगितले. सध्या पोस्टाच्या योजनांकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. याचा फायदा अधिकारी व कर्मचारी यांनी केला पाहिजे. तसेच पोस्टाचे महसूल वृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजे असही मधाळे यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यामधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा डाकपाल तसेच पोस्टमास्तर यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी पोस्टाच्या योजना या तळागाळात पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक डाक अधीक्षक पंकज कुळकर्णी, संदीप पाटील, पारूल सूचक, अभिषेक सिंग, रामिसंग परदेशी, अमोल गवांदे, संदेश बैरागी, मोटीवेशनल ट्रेनर हेमंत शिंदे, हेमंत सोनवणे व जिल्हातील सर्व शाखा डाकपाल उपस्थित होते. अभिजित वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.