नाशिक जिल्ह्यात ११ ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:16 PM2019-11-11T13:16:38+5:302019-11-11T13:23:49+5:30

लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत.

Nashik district raids onion traders at 5 places | नाशिक जिल्ह्यात ११ ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी

नाशिक जिल्ह्यात ११ ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी

Next

लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत. अशाच प्रकारच्या नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा व्यापाºयांवर ११ ठिंकाणी धाडी टाकण्यात आल्याचे समजते. देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाºयांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. यावाबत अधिकाºयांशी विचारणा केली असता त्यांंनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. 
--------------
कांद्याच्या चढ्या दराचा परिणाम
देशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चढेच राहिल्यामुळे महानगरांमध्ये कांद्याचे प्रतिकिलो दर शंभर रु पयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने १५ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या काळात देशात १ लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमटीसी कंपनीला कांदा आयातीचे निर्देश दिले असून, त्या कांंद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपवली आहे. राज्यातील कांदा नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला असून, कांदा उत्पादकांनात मोठी तुट होण्याची शक्यता आहे . जिल्ह्यात ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीपैकी तब्बल १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतकरी आणि अभ्यासकांचे मत आहे. चांदवड, येवला, सिन्नर, निफाड तसेच कसमादे पट्टयातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागांतील कांदा उत्पादनात देखील घट येणार आहे. अवकाळी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा साडेसतरा हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. कांद्याच्या लागवडी बाधित झाल्याची स्थिती निम्म्यापेक्षा अधिक असल्याचे कांदा उत्पादक व अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले त्यात नंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांनी तयार केलेली रोपे खराब झाली. शेतकºयांनी पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लागवडी केल्या. या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे.

Web Title: Nashik district raids onion traders at 5 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक