नाशिक जिल्ह्यात घासलेट घोटाळा?

By admin | Published: November 12, 2016 12:24 AM2016-11-12T00:24:15+5:302016-11-12T00:41:38+5:30

मागणी घटली : वापरकर्त्यांची माहिती गुलदस्त्यात

Nashik district's Ghoselet scam? | नाशिक जिल्ह्यात घासलेट घोटाळा?

नाशिक जिल्ह्यात घासलेट घोटाळा?

Next

नाशिक : दोन गॅस सिलिंडरधारकास घासलेट न देण्याचा निर्णय घेऊन ज्यांच्याकडे गॅस नाही अशा पात्र शिधापत्रिकाधारकांनाच गेल्या सात महिन्यांपासून घासलेट वाटप केले जात असताना आता मात्र असे घासलेट घेणारा कोणीच पुढे येत नसल्याने सात महिन्यांपासूनच्या लाखो लिटरच्या घासलेटचा काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळेच की काय पुरवठा विभागाने चालू महिन्यात घासलेटची मागणी चक्क एक टक्क्यावर आणल्याने नजीकच्या काळात घासलेटच नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच राज्य सरकारांना पत्र पाठवून ज्या शिधापत्रिकाधारकांना घासलेट दिले जाते, त्या ग्राहकांचे आधारक्रमांक गोळा करण्याचे आदेश दिले. ३१ आॅक्टोंबरपर्यंत ही माहिती जमा करून त्या आधारे नोव्हेंबरमध्ये वाटप करावयाच्या घासलेटचा कोटा निश्चित करण्याची मुदतही घालून देण्यात आली होती. या संदर्भात पुरवठा विभागाने प्रत्येक घासलेट परवानाधारकांना कल्पना देवून त्यांच्याकडून घासलेट नेणाऱ्या ग्राहकांचे आधारक्रमांक गोळा करून आणून देण्याचे आवाहन केले. परंतु त्याला प्रतिसादच मिळाला नाही. केंद्र सरकारने १ एप्रिलपासून दोन गॅस सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकास घासलेट न देण्याचा निर्णय घेतला होता. हे करताना ज्यांना घासलेट दिले जाणार आहे अशांची यादीही रेशन दुकानदार व घासलेट परवानाधारकांकडून घेण्यात आली.
या यादीच्या आधारेच एप्रिलपासून जिल्ह्णात जवळपास १२ लाख ८४ हजार लिटर घासलेटचे वितरण सुरू झाले. दरमहा इतक्या मोठ्या प्रमाणावर घासलेट जिल्ह्णात वितरित होत असताना त्यात पुरवठा खात्याच्या आदेशान्वये काही शिधापत्रिकाधारकांकडून गॅस नसल्याबाबतचे बंधपत्र भरून घेण्यात आले व ज्यांना घासलेट दिले जात आहे ते नियमानुसार व कायदेशीर असल्याचा पवित्रा पुरवठा खात्याने घेतला तर दुसरीकडे ज्या रेशन दुकानदार व घासलेट विक्रेत्यांनी बंधपत्र भरून देण्यास नकार दिला अशा शहरातील सुमारे साडेतीनशे दुकानदारांचा घासलेट पुरवठा बंद केला होता.
आता मात्र ज्या शेकडो घासलेट विक्रेत्यांना तसेच रेशन दुकानदारांना पुरवठा खात्याच्या मर्जीने गेल्या सात महिन्यांपासून घासलेट वाटप करण्यात आले, त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच दुकानदारांनी ज्यांना घासलेट विक्री केली त्यांचे आधारक्रमांकाची माहिती पुरवठा विभागााला सादर केली आहे. याचाच अर्थ गेल्या सात महिन्यात जिल्ह्णात ज्यांच्या नावे घासलेट उचलण्यात आले, त्या व्यक्ती अस्तित्वातच नसून त्यांच्याआड घासलेटचा काळाबाजार झाल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik district's Ghoselet scam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.