नाशिक जिल्ह्याच्या वैभवाचा उलगडणार पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:16 AM2020-01-13T01:16:06+5:302020-01-13T01:16:38+5:30

२०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्यातून नाशिकच्या प्रगतीचा पट उलगडला जाणार आहे. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा हा सोहळा देदीप्यमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

 Nashik district's glory fold | नाशिक जिल्ह्याच्या वैभवाचा उलगडणार पट

नाशिक जिल्ह्याच्या वैभवाचा उलगडणार पट

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा पुढाकार : जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त

नाशिक : २०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्यातून नाशिकच्या प्रगतीचा पट उलगडला जाणार आहे. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा हा सोहळा देदीप्यमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
पौराणिक आणि धार्मिक नगरीबरोबरच उद्योग आणि शिक्षणातही अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे. रामायण काळाचे महत्त्व, गोदावरी, कुंभमेळा आणि धार्मिक स्थळांच्या महत्त्वामुळे नाशिकची ओळख जगभर आहे. समृद्ध वारसा लाभलेल्या नाशिकची परंपरा अनेक क्षेत्रात वारंवार अधोरेखित झालेली आहे. जिल्ह्याने आजवर प्रगतीचे अनेक टप्पे गाठलेले आहेत.
जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने नाशिकचा हा इतिहास जनतेसमोर मांडण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केलेली आहे.
नागरिकांना सहभागी करणार
साहित्यापासून ते खेळापर्यंतचा प्रवास आणि खाद्यसंस्कृतीपासून ते उद्योगातील भरारीपर्यंत प्रगतीचा आलेख वाढणाºया नाशिकविषयी अधिक माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
समृद्ध नाशिकचे प्रदर्शन भरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकविषयीची माहिती असणाºयांना प्रशासनाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:  Nashik district's glory fold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.