नाशिक विभाग माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी आर.डी. निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:49+5:302021-09-03T04:14:49+5:30
पुणे येथे सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या ...
पुणे येथे सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची बैठक झाली. बैठकीत शासनाकडे प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ देण्यात यावेत, सुट्टीच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम केलेले आहे त्या कामाची सेवा पुस्तकात नोंद करण्यात यावी, तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखाचे विमा कवच देण्यात यावे, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, आधार कार्डप्रमाणे करण्यात येणाऱ्या संच मान्यतेस तूर्त स्थगिती देण्यात यावी, डीसीपीएस योजनेचे एनपीएस योजनेत रूपांतर झाल्याने त्याचा सर्व सविस्तर हिशेब शिक्षक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी तत्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, केंद्राप्रमाणे प्रलंबित महागाई भत्ता थकबाकीसह तत्काळ देण्यात यावा, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोकण विभाग माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी नरसु पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी फेडरेशनचे कार्यवाह, शालिग्राम भिरूड, फेडरेशनचे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष टी.एम.डोंगरे, कार्यवाह चंद्रकांत कुशारे, मोहन चकोर, राज्य समन्वयक, नीलेश ठाकूर, प्रदीपसिंह पाटील, संजय गीते, बाळासाहेब देवरे, त्र्यंबक मार्तंड, अरुण पवार, सचिन शेवाळे,भाऊसाहेब शिरसाठ, रमेश घोडके, अतुल आढाव, सी.डी.अहिरे आदी उपस्थित होते.