नाशिक विभागात  ‘एसटी’ला ज्येष्ठांचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:54 AM2018-08-28T00:54:57+5:302018-08-28T00:55:43+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ज्येष्ठ नागरिकांचे वावडे असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकाचे वय आता शासनाने साठ वर्षे केले असले तरी अद्याप महामंडळाच्या नाशिक विभागात धावणाऱ्या बसेसमध्ये वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या प्रवाशांना प्रवासभाड्यात कुठलीही सूट दिली जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

 In the Nashik division, the seniority of the ST for the 'ST' | नाशिक विभागात  ‘एसटी’ला ज्येष्ठांचे वावडे

नाशिक विभागात  ‘एसटी’ला ज्येष्ठांचे वावडे

Next

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ज्येष्ठ नागरिकांचे वावडे असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकाचे वय आता शासनाने साठ वर्षे केले असले तरी अद्याप महामंडळाच्या नाशिक विभागात धावणाऱ्या बसेसमध्ये वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या प्रवाशांना प्रवासभाड्यात कुठलीही सूट दिली जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.  ज्येष्ठ नागरिकाचे वय ६५ वरून साठ करण्यात आले असून, शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे. मात्र याबाबत एस.टी. प्रशासन अनभिज्ञ असून, ज्येष्ठांना प्रवासाच्या दरात सवलत दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयाचा पुरावा दाखविल्यानंतरही प्रवासादरम्यान बसच्या वाहकाकडून प्रवासखर्चात सूट मिळत नाही, याउलट साठी पूर्ण केलेल्या किंवा गाठलेल्या नागरिकांना प्रवासात सूट देण्याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तालुका पातळीवर किंवा शहराबाहेर प्रवास करताना ज्येष्ठांना प्रवासखर्चात सवलत दिली जात नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वयाची साठी पूर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळाल्याचे शासनाकडून सांगितले जात असले तरी ज्येष्ठांच्या सवलती मिळविण्यासाठी त्यांना ६५ वर्षे पूर्ण करावी लागणार असल्याची परिस्थिती आहे. एकूणच शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाºया एस.टी. भाड्यामधील सवलतीला मुकावे लागत आहे. त्यामुळे वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या व्यक्तींना महामंडळाने प्रवासभाड्यात सूट देण्याची मागणी वयाची साठी पूर्ण केलेल्या व साठी गाठलेल्या नागरिकांनी केली आहे.  महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत लक्ष घालून शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तत्काळ परिपत्रक जाहीर क रून बसवाहकांना वयाची साठी पूर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रवास खर्चाची सवलतीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
समस्येबाबत विचार करण्याची गरज
महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाने या समस्येबाबत विचार करण्याची गरज आहे. साठी पूर्ण केलेल्या किंवा गाठलेल्या नागरिकांना प्रवासात सूट देण्याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तालुका पातळीवर किंवा शहराबाहेर प्रवास करताना ज्येष्ठांना प्रवासखर्चात सवलत दिली जात नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Web Title:  In the Nashik division, the seniority of the ST for the 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.