Nashik: नाशिकमध्ये जगन्नाथ रथोत्सवात विभागीय आयुक्त गेडाम, जिल्हाधिकाऱ्यांनी झाडले रस्ते

By संजय पाठक | Published: July 7, 2024 06:19 PM2024-07-07T18:19:22+5:302024-07-07T18:19:55+5:30

Nashik News: गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्येही पुरी येथील जगन्नाथाच्या रथोत्सवाच्या धर्तीवर नाशिकमध्येही रथोत्सव साजरा होतो. आज हा रथोत्सव साजरा होत असताना नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चक्क झाडू मारून स्वच्छता सेवा केली.

Nashik: Divisional Commissioner Gedam, District Collector swept roads during Jagannath Rathotsav in Nashik. | Nashik: नाशिकमध्ये जगन्नाथ रथोत्सवात विभागीय आयुक्त गेडाम, जिल्हाधिकाऱ्यांनी झाडले रस्ते

Nashik: नाशिकमध्ये जगन्नाथ रथोत्सवात विभागीय आयुक्त गेडाम, जिल्हाधिकाऱ्यांनी झाडले रस्ते

- संजय पाठक 
नाशिक- गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्येही पुरी येथील जगन्नाथाच्या रथोत्सवाच्या धर्तीवर नाशिकमध्येही रथोत्सव साजरा होतो. आज हा रथोत्सव साजरा होत असताना नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चक्क झाडू मारून स्वच्छता सेवा केली.

नाशिक येथील जुना आडगाव येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथून आज सकाळी जनन्नाथ यात्रा आज सकाळी काढण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त प्रविण
गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत होते. यावेळी त्यांनी ही सेवा केली. दरम्यान, भगवान जगन्नाथाची पुजा पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण दास यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महिला आणि पुरूषांनी हा रथ ओढला. या रथोत्सवात हिंदू धर्मावरच जल, वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

Web Title: Nashik: Divisional Commissioner Gedam, District Collector swept roads during Jagannath Rathotsav in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक