‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:16 AM2019-10-22T01:16:16+5:302019-10-22T01:16:54+5:30

पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला.

 In 'Nashik East', in the morning, discouraged, crowded in the afternoon | ‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी

‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी

Next

पंचवटी : पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी अचानक मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याने फुलेनगर, उन्नती शळा, आर. पी. विद्यालय येथे मतदान संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्या.
नाशिक पूर्व मतदारसंघातील ३११ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वीच सर्वच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींच्या समक्ष ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची रंगीत तालीम घेण्यात आली. मात्र पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने मतदारांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला. त्यामुळे सुरुवातीच्या दोन तासात ७ टक्केच मतदान होवू शकले. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला हक्क बजावून ते पुढच्या नियोजनाला लागले. त्यानंतर मात्र मतदारांचा ओघ वाढला. यावेळी नवमतदार, युवक-युवती व आबालवृद्धांनी तसेच साधू-महंत, अपंग व्यक्तींनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे सापडत नसल्याने गैरसोय निर्माण झाली. तर काही मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने काहीकाळ मतदानप्रक्रिया थांबविण्यात येऊन यंत्र बदलण्यात आले. सकाळी ११ वाजता ११ टक्के मतदान झाले. मतदारांचा ओघ कायम राहिल्याने दुपारी १ वाजता २३ टक्केमतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारनंतर मात्र मोठ्या प्रमाणात मतदार घराबाहेर पडले.
दुपारी ४ वाजेनंतर उन्नती शाळा, आरपी विद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय येथील महापालिकेच्या शाळेत मतदारांची मोठी गर्दी वाढली. मतदानासाठी आलेल्या अंध-अपंग व्यक्तींना व अबालवृद्धांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी पोलीस कर्मचारी व शाळेतील स्वयंसेवक मदत करत होते. तसेच वृद्धांना थेट दुचाकीवर बसवून मतदान केंद्राबाहेर सोडले जात होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४० टक्के मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांवर चोख पोलीस बळ तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलेनगर येथील मतदान केंद्रावर ५ वाजेनंतर मतदारांची गर्दी झाली होती त्यामुळे रात्री ८पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सरासरी ४७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बाजार समितीत शुकशुकाट
विधानसभा निवडणुकीनिमित्त नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दुपारी कोणत्याही शेतमालाचे लिलाव झाले नाही. एरवी शेतकऱ्यांच्या वर्दळीने फुलणाºया बाजार समितीत सोमवारी दुपारी शुकशुकाट पसरला होता. मतदानामुळे सोमवारी दुपारी बाजार समितीत कोणत्याही प्रकारच्या शेतमालाचे लिलाव झाले नाही. मात्र काही शेतकरी बांधवांनी जो शेतमाल आणला होता त्याचे व्यवहार झाले. परिणामी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी वर्तविला. सायंकाळी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर बाजार समितीत सायंकाळचे शेतमालाचे लिलाव पूर्ववत झाले.

Web Title:  In 'Nashik East', in the morning, discouraged, crowded in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.