नाशिक निवडणूक निकाल: छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 09:47 AM2019-10-24T09:47:29+5:302019-10-24T09:55:27+5:30
vidhansabha election results2019 नाशिक- राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून आघाडीवर असले तरी त्यांचे पुत्र आमदार आमदार पंकज भुजबळ हे पिछाडवीर आहेत.
ठळक मुद्देनांदगाव- मनमाड मतदार संघात धक्काशिवसेनेचे सुहास कांदे आघाडीवर
नाशिक- राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून आघाडीवर असले तरी त्यांचे पुत्र आमदार आमदार पंकज भुजबळ हे पिछाडवीर आहेत.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघावर पंकज भुजबळ हे सलग दोन निवडणूकीत विजयी झाले होते. यंदा त्यांना निवडणूक कठीण होते. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी त्यांना प्रबळ आव्हान उभे केले होते. भाजपाच्या रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केली असली तरी त्याचा फायदा भुजबळ यांना झाल्याचे दिसत नाहीये.
विधान सभा निवडणूकीच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेरीस शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार पंकज भुजबळ यांच्या पेक्षा ४३९९ मतांनी आघाडीवर आहेत. सुहास कांदे यांना यांना ९५५३ तर पंकज भुजबळ यांना ५१५४ मते मिळाली आहेत.