नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 02:25 PM2019-10-24T14:25:01+5:302019-10-24T14:31:36+5:30

यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्यावही मागणी केली. अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम कारत असल्याचा आरोप केला.

 Nashik election results: Declaration of Sanap candidates in pre-constituency; The counting process ended in the tenth round | नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली

नाशिक निवडणूक निकाल : पुर्व मतदासरसंघात सानप उमेदवारांची घोषणाबाजी; मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीत रखडली

googlenewsNext
ठळक मुद्देयेथील ३० मतमोजणी यंत्रे बदलण्यात आले;मतमोजणी प्रक्रीया दहाव्या फेरीमध्ये थांबविली गेली.पोलिसांनीदेखील ‘अ‍ॅलर्ट’ दिला

नाशिक : पुर्व मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया दहाव्या फेरीमध्ये रखडली आहे. येथील मिनाताई ठाकरे स्टेडियममध्ये सुरू असलेल्य मोजणीदरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप समर्थकांनी आक्षेप घेत जोरदार घोेषणाबाजी सुरू केली तसेच कॉँग्रेसचे गणेश उन्हवणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यामध्ये सहभाग घेत मोजणीप्रक्रियेतील गोंधळाविषयी निवडणूक निरिक्षकांकडे तक्रार करत मतमोजणी प्रक्रिया थांबविण्यास भाग पाडले. 9 व्या फेरीला गणेश उन्हावणे यांनी मशीन बदलल्याचा आरोप करत मतमोजणी वर हरकत नोंदवली तसेच मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्यावही मागणी केली. अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम कारत असल्याचा आरोप केला. येथील ३० मतमोजणी यंत्रे बदलण्यात आले; मात्र एकावरही भाजप वगळता अन्य सह्या न घेतल्याने हरकत नोंदविण्यात आली मात्र हे अर्ज फेटाळून लावत मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद अंतुरकर यांनी सुरू क रण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्त्यांसह उमेदवार प्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी सुरू के ली. यावेळी निवडणूक निरिक्षकांकडे तक्रार करत मतमोजणी प्रक्रीया दहाव्या फेरीमध्ये थांबविली गेली. दरम्यान, पोलिसांनीदेखील ‘अ‍ॅलर्ट’ दिला असून वाढीव पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार राज्य राखीव दलासह दंगलनियंत्रण पथकाचे काही जवान येथे तैनात केल्याचे समजते.
 

Web Title:  Nashik election results: Declaration of Sanap candidates in pre-constituency; The counting process ended in the tenth round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.