नाशिक निवडणूक निकाल : राहूल ढिकले, सीमा हिरेंसह देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:25 AM2019-10-24T10:25:36+5:302019-10-24T10:25:36+5:30
Nashik vidhansabha election results 2019 नाशिक पुर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात पहिली फेरी पूर्ण झाली आहे. तसेच देवळाली मतदारसंघात दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. यानंतर स्पष्ट झालेले चित्र अत्यंत धक्कादायक आहे.
नाशिक : निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. नाशिक पुर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात पहिली फेरी पूर्ण झाली आहे. तसेच देवळाली मतदारसंघात दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. यानंतर स्पष्ट झालेले चित्र अत्यंत धक्कादायक आहे. उत्कंठा अधिक असलेल्या पश्चिममधून सीमा हिरे, तर पुर्वमधून राहूल ढिकले आणि मध्यमधून देवयानी फरांदे यांनी आघाडी घेतली आहे. तसेच देवळाली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश घोलप हे पिछाडीवर असून तेथे राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांनी ७ हजार ७५४ मतांनी आघाडी घेतली आहे.
नाशिक मध्य मतदारसंघा पहिल्या फेरीअखेर देवयानी फरांदे यांना ४ हजार ८७७ तर मनसेचे नितीन भोसले यांना २हजार २९५ मते मिळाली आहे. तसेच कॉँग्रेसची मोठी वाताहत पहिल्या फेरीअखेर दिसत आहे. हेमलता पाटील यांना केवळ ८९० मते मिळाली. या मतदारसंघात एकूण ८२७५ मते पहिल्या फेरीअखेर वैध ठरली.
दुसऱ्या फेरीत दुसºया फेरीत देवयानी फरांदे यांना ७ हजार ६८६ तर हेमलता पाटील यांनी अचानकपणे उसळी घेत ३हजार ९२४ मते मिळविली तर नितीन भोसले यांना ३०७६ मते पडली आहेत.
नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांनी आघाडी घेत पहिल्या फेरीअखेर ५ हजार ९५४ मते मिळविली तर राष्ट्रवादी अपुर्व हिरे यांना ३ हजार ८८६ मते मिळाली. मनसेचे दिलीप दातीर यांना अवघे ८१२ मते मिळाली आहेत. तसेच शिवसेनेचे बंडखोेर विलास शिंदे हे मित्रपक्ष उमेदवार सीमा हिरे यांना टक्कर देत असून ३ हजार ७३७ मते मिळविली आहे.
देवळाली मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. योगेश घोलप यांना धक्का बसला असून त्यांना केवळ २हजार ८७१ मते तीसºया फेरीत मिळाली तर राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांना १० हजार ६०० मते मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने आहिरे यांनी घोडदौड सुरू ठेवली आहे.