नाशिकला भविष्यात भूकं पाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:20 AM2017-09-10T01:20:13+5:302017-09-10T01:20:22+5:30

त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणाºया गोदावरीच्या वरील बाजूस उत्तरेला शहरापासून केवळ आठ ते दहा किलोमीटरवर भूगर्भाला हजारो वर्षांपूर्वी एक तडा गेला आहे. हा तडा भविष्यात भूकंपाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Nashik is facing future risk of starvation | नाशिकला भविष्यात भूकं पाचा धोका

नाशिकला भविष्यात भूकं पाचा धोका

Next

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणाºया गोदावरीच्या वरील बाजूस उत्तरेला शहरापासून केवळ आठ ते दहा किलोमीटरवर भूगर्भाला हजारो वर्षांपूर्वी एक तडा गेला आहे. हा तडा भविष्यात भूकंपाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नाशिकचा समावेश भूकंप प्रभाव क्षेत्र विभाग तीनमध्ये झाला आहे.
आयएस कोड १३९२०/१८९९३ हा भूकंप प्रतिरोधकच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला आहे. बांधकाम हे भूकंपापासून कसे सुरक्षित ठेवता येऊ शक तात यासाठी मार्गदर्शक तत्त्वे भारतीय मानांकन संस्थेने या कोडमध्ये निश्चित केली आहे. २००० साली गुजरातच्या भूजमध्ये आलेल्या भूकंपानंतर किरकोळ बदल कोडमध्ये झाले; मात्र गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले.
सद्यस्थितीत भूकंपाची तीव्रता व शक्यता लक्षात घेऊन चार विभागाची आखणी करण्यात आली असून ती अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ अशी आहे. या विभागानुसार भूकंपामुळे निर्माण होणारा दाब लक्षात घेऊन बांधकाम करण्याचे मापदंड या दोन्ही कोडमध्ये सांगितले आहे. या कोडमध्ये करण्यात आलेल्या बदलात इमारतींचे कॉलम व बीमचा किमान आकार, स्टीलचा दर्जा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हे बदल आगामी काळात वास्तुविशारद व अभियंत्यांना समजून घ्यावे लागणार आहे. सध्याच्या बांधकाम क्षेत्रात स्ट्रक्चरल डिझाइन करताना आय एस कोड १३९२० व १८९३ भाग (१), (४) मध्ये बदल करण्यात आले. हे बदल बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षेकरिता करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वैराज कलादालनामध्ये शनिवारी (दि.९) असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सच्या नाशिक शाखेच्या वतीने विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत भारतीय मानांकन संस्थेचे सदस्य असलेले डॉ. संदीप शिरखेडकर, डॉ. रमाकांत इंगळे, डॉ. ओ. आर. जैस्वाल आदींनी नाशिक विभागातून उपस्थित झालेल्या सुमारे दोनशे अभियंत्यांना मार्गदर्शन केले. भूकंपाची शक्यता गृहीत धरून भूकंप प्रतिरोधक बांधकामाविषयी नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे.

Web Title: Nashik is facing future risk of starvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.