भावगीतांसह चित्रपट गीतांचा नाशिककर रसिकांना आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:48+5:302021-02-10T04:15:48+5:30
नाशिक : परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 'आपली आवड ' ही अवीट गोडीच्या मराठी गीतांची मैफल रंगली. नटरंग उभा... या गीताने ...
नाशिक : परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 'आपली आवड ' ही अवीट गोडीच्या मराठी गीतांची मैफल रंगली. नटरंग उभा... या गीताने सुरुवात झालेल्या या मैफलीत घनश्याम सुंदरा... या भूपाळीसह एक धागा सुखाचा...जगी जीवनाचे सार आदी भावगीते , भक्तीगीते आणि सख्यारे घायाळ मी हरिणी, लटपट लटपट तुझे चालणे यासारख्या सुरेल व मनमोहक सदाबहार गीतांचा आस्वाद रसिकांनी लोकोत्सवच्या माध्यामातून घेतला.
बाबाज् थिएटर्सतर्फे परशुराम सायखेडकर सभागृहात मंगळवारी (दि.०९) लोकोत्सव २०२१ सांस्कृतिक सोहोळ्यात मराठी भावगीते, भक्तीगीतांसह गाण्यांचा 'आपली आवड ' सुरेल कार्यक्रम रंगला. यात ताल धरत नव्या जुन्या ६१ गाण्यांचा आनंद लुटला आपली आवडती गाणी अनुभवली. गायक चैतन्य कुलकर्णी, चेतन लोखंडे, मीना परुळकर - निकम, श्रावणी महाजन, प्रियांका कोठावदे, अमोल पाळेकर या गायकांनी एका मागून एक सुरेल गीतांचे सादरीकरण करीत ससिकांची मने जिंकली. त्यांना समीर शेख, निखिल खैराते, सुधीर सोनवणे, अभिजित शर्मा, देवानंद पाटील, शुभम जाधव, ओम गायकवाड, चैतन्य पाळेकर यांनी दमदार साथसंगत केली. संतोष फासाटे यांनी निवेदनाबरोबरच मिमिक्री करून हास्यरंग भरले. बाबाज् थिएटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी प्रास्ताविक केले.
===Photopath===
090221\09nsk_36_09022021_13.jpg
===Caption===
आपली आवड मैफीलीत गायनाविष्कार सादर करताना चैतन्य कुलकर्णी, चेतन लोखंडे, मीना परुळकर - निकम, श्रावणी महाजन, प्रियांका कोठावदे, अमोल पाळेकर आदी