नाशिकमध्ये पाच दिवसांचा चिमुकला अन् दहा दिवसांची चिमुकली कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:37 PM2020-05-11T21:37:59+5:302020-05-11T21:48:27+5:30

एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक

In Nashik, five-day Child and six-day female child corona are affected | नाशिकमध्ये पाच दिवसांचा चिमुकला अन् दहा दिवसांची चिमुकली कोरोनाबाधित

नाशिकमध्ये पाच दिवसांचा चिमुकला अन् दहा दिवसांची चिमुकली कोरोनाबाधित

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक शहरात कोरोनाचे ३९ रुग्णशहरातील २७ उपनगरे प्रतिबंधीत क्षेत्र सर्वाधिक ५४८ रुग्ण हे मालेगाव महापालिका क्षेत्रात

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (दि.११) जिल्ह्यात रात्री नऊ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९३ वर पोहचला. सोमवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात धक्कादायक बाब म्हणजेत नाशिक जिल्ह्यातील विंचुरमधील ५ दिवसाच्या बाळाला तर मालेगावमधील चंदनापुरी येथील दहा दिवसांच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५४८ रुग्ण हे मालेगाव महापालिका क्षेत्रातील आहे. नाशिक शहरात कोरोनाचे ३९ रुग्ण अद्याप आढळून आले आहे.नाशिक ग्रामिणमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८५वर पोहचला आहे.
नाशिक ग्रामिणमधील नाशिक तालुक्यात ८ येवल्यामध्ये ३१ तर चांदवड-४ सिन्नर-६, निफाड-११, दिंडोरी-६ नांदगाव-३, सटाणा-२ आणि मालेगाव ग्रामिण-१४ अशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात बळींचा आकडा वाढून ३३ झाला आहे, यामध्ये ३१ कोरोनाग्रस्त रुग्ण मालेगावमध्ये दगावले आहेत.
सुदैवाने सोमवारी नाशिक शहरात कोठेही कोरोनाचा रूग्ण आढळून आला नाही. नाशिकमध्ये अद्याप सातपूर परिसरात १६, सिडको भागात ८, पंचवटी परिसरात ५, नाशिक पुर्व भागातील विविध उपनगरांत ४, नाशिकरोड भागात ३, नाशिक पश्चिममध्ये १ आणि स्थलांतरीत मनपा हद्दीबाहेरील २ अशा ३९ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरात एका पोलिसासह गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे. शहरात सोमवारी एकूण ८१ कोरोना संशयित रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. कोरोना आजारातून पुर्णपणे बरे होऊन शहरातील ९ रुग्ण अद्याप घरी गेले आहेत.
एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात असल्याचे दिसून येत आहेत.
-----
शहरातील २७ उपनगरे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून ‘सील’ (कंसात सीलची मुदत)
सिडको - (१८ मे पर्यंत)
नवश्या गणपती मंदीर परिसर (२२ मे)
धोंगडे मळा, ना.रोड (२२ मे)
समाजकल्याण कार्यालय, पौर्णिमा बस स्टॉप (२७ मे)
संजीवनगर नाशिक (३० मे)
चित्रलेखा सोसा. आरटीओ कॉर्नर (६ जून),
सावतानगर सिडको (१३ जून)
उत्तमनगर सिडको (१३ जून)
मालपाणी सॅफ्रॉन, पाथर्डी फाटा (१३ जून)
सातपूर कॉलनी ( १३ जून)
वृंदावन कॉलनी, जनरल वैद्यनगर (१४ जून)
बजरंगवाडी झोपडपट्टी (१६ जून)
शांतिनिकेतन चौक ( १७ जून )
माणेक्षानगर (१७ जून)
पाटीलनगर, सिडको ( १९जून)
हनुमान चौक, सिडको (१९ जून)
जाधव संकुल, नाशिक ( १९ जून )
हिरावाडी, पंचवटी ( १९जून)
श्रीकृष्णनगर (१९ जून)
इंदिरानगर (२०जून)
तारवालानगर (२०जून)
अयोध्यानगरी, हिरावाडी (२०जून)
तक्षशिला रो-हाऊस परिसर, कोणार्कनगर-२ (२०जून)
सागर व्हिलेज, धात्रकफाटा परिसर (२० जून)
हरी दर्शन सोसा. धात्रकफाटा (२० जून)
सिन्नरफाटा, नाशिकरोड (२१ जून)

 

Web Title: In Nashik, five-day Child and six-day female child corona are affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.