रिमझीम पावसाच्या सरींनी नाशिककर चिंब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:44 PM2020-06-29T15:44:21+5:302020-06-29T15:46:10+5:30

सलग दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी  कोसळल्यानंतर रविवारी पाससाने विश्रांती घेतली. परंतु सोमवारी (दि.२९) दुपारी एक वाजेपासून पुन्हा शहरात रिमझीम पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककर पावसाच चिंब झाले.

Nashik is flooded with drizzle | रिमझीम पावसाच्या सरींनी नाशिककर चिंब 

रिमझीम पावसाच्या सरींनी नाशिककर चिंब 

googlenewsNext
ठळक मुद्देनाशकात रिमझीम पावसाच्या सरीपावसाच्या सरींनी नाशिककर चिंब

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी  कोसळल्यानंतर रविवारी पाससाने विश्रांती घेतली. परंतु सोमवारी (दि.२९) दुपारी एक वाजेपासून पुन्हा शहरात रिमझीम पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककर पावसाच चिंब झाले असून शहर व परिसरातील वातावरणात गारवा पसरला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी उसंत घेतल्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा शहरात पावसाच्या सरी बरसल्या. दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले होते. मात्र सोमवारी शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस असल्याने शहरातील विविध भागात चिकचिक झाली होती.  सोमवारी सकाळपासूनच नाशिककरांना प्रचंड उकाडा जाणवत असताना दुपारच्या सुमारास पावसाच्या रिमझीम  सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे शहर परिसरातील मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, शालीमार परिसरातील व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने आवरती घेतली . तर पावसामुळे ग्राहकांचीही वर्दळ रोडवल्याचे दिसून आले. दरम्यान, नाशिक शहर परिसरात पावसाची रिमझीम  सुरू असली तरी जुन महिना संपत आला असल्याने नाशिककरांना मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. नाशिक जिल्हा प्रामुख्याने शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाना तालुक्यांमध्ये भाताचे पिक घेतले जाते. त्यामुळे शेतकºयांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक ठिकाणी लावणीची कामे सुरू झाली असून शेतकºयांना वीजपंप व डिजेलच्या पंपांद्वारे पाणी देऊन भात लावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे निफाज, सिन्नर तालुक्यांमध्ये सोयाबीन पेरणीसाठी पुरेशी ओल उतरण्यासाठी जोरदार पाऊसाची शेतकºयांना प्रतिक्षा आहे. 

Web Title: Nashik is flooded with drizzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.