Nashik: नाशिकमध्ये मतदान जनजागृती साठी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर
By संकेत शुक्ला | Published: May 1, 2024 12:56 PM2024-05-01T12:56:42+5:302024-05-01T12:57:11+5:30
Nashik: महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत शहरात मतदान जनजागृती काढली.
- संकेत शुक्ल
नाशिक - महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत शहरात मतदान जनजागृती काढली.
पोलीस कवायत मैदान येथून सुरू झालेल्या या रॅलीत जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी अनुप यादव, तहसीलदार मंजुषा गाडगे यांच्यासह अ कामीचे प्रशिक्षणार्थी, शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
या रॅलीत वोटकर नाशिककर, मतदार राजा जागा हो, वोट की किंमत कभी ना लेंगे लेकिन वोट जरूर देंगे, निर्भय होऊन मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती पथनाट्याची सादरीकरण केले. मतदानाची शपथ घेऊन रॅलीची सांगता झाली.