नाशिक :चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली उतरविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 01:08 PM2017-11-27T13:08:35+5:302017-11-27T14:44:00+5:30

चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे.

Nashik: Four trekkers, who went to Chamor cave, got stuck, Rescue operation started | नाशिक :चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली उतरविण्यात यश

नाशिक :चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली उतरविण्यात यश

googlenewsNext

नाशिक- चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे. सोमवारी  सकाळी अकरा वाजेपासून या मुलांना खाली आणण्याचे प्रयत्न सुरू होते. चामर लेणीवर  गेलेले चार विद्यार्थी सोमवारी सकाळी कड्यावर अडकल्याची घटना घडली आहे. या मुलांना वाचविण्यासाठी गेलेला एक तरूण कड्यावरून खाली पडला असून गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. 

  चारही मुलं लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय सावतानगरमधील आहेत. आर्यन गीते, नयन रोकडे, रोहन शेळके, आदित्य खैरनार अशी मुलांची नाव असून ते इयत्ता नववीत शिकणारे आहेत. नाशिकच्या सिडकोचे हे चौघे रहिवासी आहेत. 

चार मुलं लेणीच्या कड्यावर अडकल्याचं त्या भागात फिरत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर ते दोघे लेणीच्या दिशेने धावले. यावेळी एक तरुण खाली कोसळला असून तो जखमी झाला आहे. त्या विद्यार्थ्य्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, कड्यावर अडकलेल्या चार मुलांबरोबर दोन मुलीही होत्या. पण त्या लेणीवर न जाता आर्ध्या रस्त्यातून खाली परतल्या असल्याचं समजतं आहे. 

Web Title: Nashik: Four trekkers, who went to Chamor cave, got stuck, Rescue operation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.