दुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:11 AM2018-05-28T04:11:29+5:302018-05-28T04:11:29+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे.
नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास गोदापात्रात पार्क
वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पार्कच्या संरक्षणासाठी नदीपात्रालगत गॅबियन वॉल बांधण्यात आली. तथापि, दर पावसाळ्यात हा पार्क पुराच्या पाण्याखाली जातो. त्यानंतर त्याची काही प्रमाणात डागडुजी केली
जाते. गेल्या काही वर्षांत गोदापार्क खचायला लागला असून, रस्ते
दुभंगू लागल्याने धोका निर्माण झाला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना म्हणजेच २००२-०३ मध्ये नाशिक मध्ये गोदावरी नदीकाठी गोदापार्क उभारला, परंतु त्याकडे नंतर कोणीही लक्ष पुरविले नाही. अगदी मनसेची महापालिकेत सत्ता आल्यानंतरही त्याकडे लक्ष न पुरविल्याने या प्रकल्पाची अवस्था बिकट झाली असून, कोणत्याही क्षणी तो नदीपात्रात कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे.